देश – विदेश

चंद्रायन -३चे चंद्रावर यशस्वी लँडिंग… वैज्ञानिकांचे हार्दिक अभिनंदन… मनसेचा उल्हासनगर मध्ये जल्लोष !!!

उल्हासनगर : भारतीय वैज्ञानिकांच्या अथक परिश्रमाने चांद्रयानं 3 चे चंद्रावर यशस्वी लँडिंग करण्यात आले . आज साय ६:०४ मी यशस्वी लँडिंग होताच उल्हासनगर महाराष्ट्र नवनिर्माण सेना लालगड शाखेच्या वतीने भारत माता की जय या घोषणा देत इस्रोच्या वैज्ञानिकांचे अभिनंदन करत मिठाई वाटप करत लालचक्की या ठिकाणी जल्लोष साजरा करण्यात आला.

मा जिल्हा उपाध्यक्ष श्री प्रदीप गोडसे यांच्या नेतृत्वाखाली लालगड शाखेचे सर्व महाराष्ट्र सैनिक व महिला कार्यकर्ते, विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी, व युवा सेनेचे सर्वच कार्यकर्ते उपस्थित होते भारतीय वैज्ञानिकांच्या अथक परिश्रमाने चांद्रयानं 3 चे चंद्रावर यशस्वी लँडिंग होताच वैज्ञानिकांचे हार्दिक अभिनंदन करत नागरिकांना मिठाईचे वाटप करण्यात आले .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.
Tags

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close