शैक्षणिक

RESULTS OF THE ICSE (CLASS X) AND ISC (CLASS XII) YEAR 2023 EXAMINATIONS

उद्या आयसीएसईच्या दहावी आणि आयएससी बारावी परीक्षेचा निकाल होणार जाहीर
~ १४ मे रोजी दुपारी ३ वाजता जाहीर होणार ~

 
मुंबई, : कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स, (सीआयसीएसई) या केंद्रीय मंडळाच्या आयसीएसई (दहावी) आणि आयएससी (बारावी)च्या परीक्षेचा निकाल रविवारी, १४ मे रोजी दुपारी ३ वाजता मंडळाच्या cisce.org आणि results.cisce.org या संकेतस्थळावर जाहीर होणार आहे. त्यासाठीची घोषणा आज मंडळाकडून करण्यात आली.
 
आयसीएसई मार्फत देश-विदेशातील विविध परीक्षा केंद्रांवर दहावीची( आयसीएसई) परीक्षा २७ फेब्रुवारी ते २९ मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. तर बारावीची (आयएससी) परीक्षा २९ फेब्रुवारी रोजी सुरू झाली होती. ती ३१ मार्चपर्यंत चालली होती यावेळी मंडळाकडून सर्व विद्यार्थ्याना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी १५ मिनिटांचा अधिकचा वेळ देण्यात आला होता. तर यंदाच्या दहावी बारावीची या परीक्षेला देश विदेशातील परीक्षा केंद्रांवर सुमारे २.५ लाखाहून अधिक विद्यार्थी परीक्षेला बसले होते
.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.
Tags

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close