क्राईम

अखेर “त्या मतिमंद” मुलीला न्याय मिळाला

ठाणे : ठाणे शहरातील श्रीनगर पोलिस ठाण्यात दिनांक- २३/०५/२०२३ व दि. २४/०५/२०२३ रोजी दाखल गुन्हयातील बळीत मतीमंद मुलगी मुळ गांव बेळगांव, कर्नाटक ही तीच्या मामाच्या घरी भवानी चौक, शांतीनगर, वागळे इस्टेट, ठाणे येथे असताना तीचे मामाचे शेजारी राहणारा इसम रोहीदास सिताराम गांगुर्डे, वय ५८ वर्षे याने तीला “आंबा खायला देतो” असे बोलून तिला त्याचे घरात नेवुन तिचे चुंबन घेवुन विनयभंग केला होता . घडलेल्या घटनेबाबत सदर मतीमंद मुलीने दि. २९/०५/२०२३ रोजी तीचा मामाला माहीती सांगितली असता तीचे मामा याने रोहीदास गांगुर्डे यांना जाब विचारण्यास गेले असता आरोपीने “पोलीसात तकार करा, मी बघुन घेईन’ अशी अरेरावीची भाषा वापरून त्यांना दमदाटी केली. तेव्हा घडलेल्या घटनेबाबत फिर्यादी सचिन जरे यांनी दि. ३०/०५/२०२३ रोजी आरोपी रोहीदास गांगुर्डे याचेविरुध्द दिलेल्या तक्रारीवरून श्रीनगर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ०१३२/२०२३ भा.द.वि. कलम ३५४, ३५४ (अ), ५०६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर गुन्हयाचे तपासात आरोपी रोहीदास सिताराम गांगुर्डे, वय ५८ वर्षे याचा तात्काळ शोध घेवुन पोलीसांनी त्यास सदर गुन्हयात अटक केली. पोलीसांनी सदर गुन्हयाचा जलगतीने १२ तासात तपास पूर्ण करून आरोपीस दि. ३०/०५/२०२३ रोजी दोषारोपासह मा. न्यायालयात हजर केले व सदर गुन्हा फास्ट ट्रॅकवर चालवण्याची मा न्यायालयास विनंती केली. मा. न्यायालयाने विनंती मान्य करून सदर खटल्याचे कामकाज लवकर चालवुन मा न्यायाधिश श्री. एच के परदेशी सो ठाणे यांचे न्यायालयाने आरोपीतास दि.०६/०७/२०२३ रोजी ‘एक वर्ष सक्त मजुरीची शिक्षा व ११ हजार रूपये दंड’ अशी शिक्षा सुनावलेली आहे. सरकार पक्षातर्फे सहा. सरकारी अभियोक्ता श्री. पिसाट यांनी कामकाज पाहीले.

तसेच सदरची उत्कृष्ठ कामगिरी मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-५, वागळे इस्टेट, ठाणे श्री. अमरसिंह जाधव, मा. सहायक पोलीस आयुक्त, वागळे इस्टेट विभाग, ठाणे श्री. गजानन कान्दुले यांचे मार्गदर्शनाखाली श्रीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार कबाडी, सहापोनिरी/संभाजी मोहिते, परि. पो.उप निरी. नितीन हांगे, पोउपनिरी प्रमोद पाटील, सहा.पो.उप निरी. माणिक इंगळे, पोहवा / मुकेश इधे, कैलास जाधव, चंद्रकांत संकपाळ, प्रकाश चव्हाण, पोशि/ निलेश धुत्रे यांनी पार पाडली आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.
Tags

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close