गारगोटी येथील सखाराम मुगडे यांचे वयाच्या १०१ व्या वर्षी निधन

गारगोटी / ( किशोर आबिटकर )
येथील भुदरगड तालुक्यातील सर्वात जास्त वयाचे प्रतिष्ठीत नागरिक शेतकरी सखाराम भाऊसो मुगडे (१०१) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, दोन मुली, नातवंडे, पतवंडे, खापर पतवंडे असा मोठा परीवार आहे. त्यांच्या कुटुंबात ७० सदस्य आहेत. नगररचना अधिकारी अभियंता सर्जेराव मुगडे यांचे ते वडील होते, रक्षाविसर्जन बुधवार ३० ऑगस्ट रोजी झाला असून शुक्रवार दि.०८.०९.२०१७ रोजी सकाळी ११ वाजता उत्तरकार्य नियोजिले आहे .

गारगोटी येथील सर्वात जास्त वयाचे प्रतिष्ठीत नागरिक श्री. सखाराम भाऊसो मुगडे यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांना १०१वर्षाचे दिर्घायुष्य लाभले.अशी वयाची शंभरी ओलांडलेली माणसं फारच क्वचित आज पाहायला मिळतात. कोणतेही दुखणे कधीही अंगी न लावता आयुष्याची शंभरी पार करण्याचे भाग्य त्यांना लाभले. या दिर्घ वयाच्या कालखंडात खापरपणतू पर्यंतच्या पाच पीढ्या त्यांनी पाहिल्या.जगण्याचे असे शेकडो उतारचढाव त्यांनी अनुभवले उघड्या डोळ्यांनी पाहिले. स्वातंत्र्यलढ्यातील वास्तवता प्रत्यक्ष अनुभवलेली. नंतरच्या काळातील बदलते जीवन, स्वातंत्र्यानंतरचे दिवस असे कितीतरी घटना प्रसंगाचे ते साक्षीदार होते.गारगोटीच्या सामाजिक जीवनाची जडणघडणही त्यांनी जवळून पाहिली , अनुभवली आहे. त्यांच्या मागे सहा मुलगे दोन मुली असा नेटका संसार करून त्यांनी येणाऱ्या प्रत्येक संघर्षाला तोंड देत अत्यंत संयमाने व धिराने जगण्याची वाट यशस्वीरित्या ते चालले आहेत. त्यांचे अष्टपैलू व्यक्तीमत्व त्यांच्या जिवन प्रवासात वेळोवेळी दिसून आले आहे. शेतीच्या प्रमुख व्यवसायाबरोबरच गवंडी काम कुशलतेने करून मौनी विध्यापिठातील निवासी बंगल्यांबरोबरच अनेक दगड/विटेमधील बांधकामे केली आहेत.मुलांना प्रतिकूल परिस्थितीत योग्य संस्कार देऊन उच्च्य शिक्षण घेण्यासाठी त्यांच्या पंखाना आवश्यक ते बळ देण्याचे काम त्यांनी केले. सर्व मुलांनी शासकीय/निम शासकीय संस्थांमध्ये यशस्विपणे नोकरी करून ते आता सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या मागे मुले, नातवंडे, पतरुंड,दतरूंड व खापर पतरूंडे असा ७० जनांची वंशावळ आहे. कै.महादेव मुगडे,ग्रामसेवक,सेवानिवृत्त लष्करी जवान दादू मुगडे,यशवंत मुगडे,कै.नामदेव मुगडे , तसेच डॉ. विष्णू मुगडे,सेवानिवृत्त विभागप्रमुख,ग्रंथालय आणि माहितीशास्त्र,भारती विध्यापीठ पुणे,आणि महाराष्ट्र शासनाचे सेवानिवृत्त नगर रचना अधिकारी सर्जेराव मुगडे यांचे ते वडील आहेत.त्यांच्या नातवंडानीही वैध्यकीय,औषधशास्त्र,अभियांत्रिकी तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रामध्ये उंच भरारी घेतली आहे.त्यामध्ये डॉ. स्वप्निल सर्जेराव मुगडे हे डेंटीस्ट असून त्यांनी कोन्झरव्हेटीव &एन्डोडोन्टिक्स या विषयामध्ये विशेष प्राविण्य संपादन केले असून ते पुण्यामध्ये कार्यरत आहेत.त्यांचे दोन नातू जसपाल पाटील व विवेक पाटील यांनी स्विडन व जर्मनीमध्ये उच्चशिक्षण घेतले असून ते त्याठीकाणी कार्यरत आहेत.त्यांची नात स्नेहा सर्जेराव मुगडे ही नोव्हार्टिस या स्विस फार्मास्यूटिकल कंपनी मध्ये एन्यालिस्ट पदावर कार्यरत आहे.तसेच त्यांचा नातू विनोद दादू मुगडे हा भारत-पाकिस्तान सीमेवर शत्रूच्या हालचालींवर नजर ठेऊन बसला आहे.त्यांचे नातू विजय सारंग यांनाही गारगोटी गावाच्या सरपंच पदी काम करण्याची संधी मिळाली तसेच मनोज मुगडे यांनी रूग्णवाहीकेच्या माध्यमातून गोरगरीबांची सेवा करीत आहेत.या सर्वांचे मार्गदर्शक व जुन्या काळातील एक आधारवड कोसळल्याने त्यांच्या कुटुंबियांच्यावर दुखाःची छाया पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.