बिद्री साखर कारखान्याचा निवडणुकीचे पडघम वाजले

बिद्री साखर कारखाना निवडणुकीचे पडघम वाजले …

मुरगूड / प्रतिनिधी
बिद्रीच्या सभासदांना अपात्र करून त्यांची साखर बंद करणाऱ्या आमदारांनी सभासदांच्या चुलीत पाणी ओतण्याचे काम केले असून सुज्ञ सभासद त्यांना जागा दाखवतील असा विश्वास राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मधुआप्पा देसाई यांनी व्यक्त केला. म्हसवे (ता.भुदरगड) येथे राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने आयोजित बिद्रीच्या पात्र अपात्र सभासदांच्या संपर्क मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी  हुतात्मा स्वामी वारके सुतगिरणीचे व्हा.चेअरमन निवासराव देसाई होते.
शेतकरी सभासदांना अपात्र करण्यात आमदारांचा नेमका हेतु  काय? असा सवाल करून श्री.देसाई म्हणाले,
मतदार संघातील विकासकामे  दुर्लक्षित ठेवून राजकीय सुडबुद्धीने गोरगरीब जनतेची सजंय गांधी निराधार योजनेची पेन्शन बंद करण्याचे कामही आमदारांनी केले आहे.
यावेळी बोलताना माजी आम.के.पी.पाटील म्हणाले बिद्री कारखान्यास तांत्रिक कार्यक्षतेच्या पुरस्काराबाबत शंका व्यक्त करणाऱ्या आमदार आबिटकर यांनी याबाबतचा खुलासा अद्यापही केलेला नाही. याचे स्पष्टीकरण देण्याबाबत काढलेली पळवाट सभासद ओळखून आहेत. याचे चोख उत्तर सभासद देतील.
यावेळी माजी आमदार नामदेवराव भोइटे, गोकुळचे संचालक विलास कांबळे, जिल्हा बँकेचे संचालक रणजीत पाटील, जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटील, तालुकाध्यक्ष पंडितराव केणे, बिद्रीचे माजी उपाध्यक्ष प्रवीण  पाटील, विलासराव झोरे, दौलतराव जाधव, सर्जेराव  देसाई, के.आय.चौगले, नंदकुमार पाटील,.बी.एम.चौगले, संग्राम देसाई, सरपंच अनिल पाटील, संतोष मेंगाने, प्रकाश पाटील, किरण पिसे, अशोक फराकटे, शेखर देसाई, विजय आबिटकर, शामराव इंदुलकर, नामदेव देवर्डेकर, बाळासाहेब गुरव यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत रविंद्र नागटिळे यांनी तर आभार विरेंद्र देसाई यांनी मानले.

 

बिद्रीच्या एकजुटीत म्हसवे करणार उच्चांक…
मधुआप्पा देसाई यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादीची ताकत वाढली असून सुतगिरणीचे व्हा.चेअरमन निवासराव देसाई व मधुआप्पा देसाई असे प्रमुख नेतेच एकत्र आल्याने म्हसवे सारख्या क्रांतीकारी गावातून बिद्रीच्या निवडणुकीत उच्चांक पहायला मिळेल असा विश्वास के.पी.पाटील यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published.