भुदरगड तालूक्याची खासियत चिखली गुट्टा शर्यत पिंपळगावात उत्साहात साजरी

भुदरगड तालूक्याची खासियत चिखली गुट्टा शर्यत पिंपळगावात उत्साहात साजरी

 

पिंपळगाव / प्रतिनिधी

वर्षभर काबाडकष्ट व मेहनत करून थकलेल्या बळीराजा-शेतकऱ्याला विरंगुळा मिळावा या उद्देशाने ‘जिद्दी ग्रुप पिंपळगाव’ गेली सहा वर्षे सातत्याने भव्य चिखली गुठ्ठा शर्यत आयोजित करत आहेत. यंदा 7 व्या वर्षी सुध्दा ही स्पर्धा उत्साहात पार पडली. स्पर्धेला प्रथम क्रमांक 10001 पासुन 10वे 1001 पर्यंत असे बक्षीस होते. कार्यक्रमाचे उद्घाटन श्री. प्रा.अर्जुनराव अबिटकर(माजी जि.प. सदस्य) व दीपप्रज्वलन सौ.स्नेहल परीट(पं.स.सदस्या) यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. जगदीश पाटील(बापू) होते. स्पर्धेला संपूर्ण जिल्हातून 30 स्पर्धक आले होते. या चुरसीच्या स्पर्धेत महादेव ग्रुप मठगाव यांनी प्रथम क्रमांक पटकावला,सुनील मस्कर,दाभिल(दुसरा),बसुदेव युवा ग्रुप, आप्पाचीवाडी(तिसरा),बंडु देसाई,भाटीवडै(चौथा),वेदांत देसाई, पोळगाव(पाचवा),आनंदा सपकाळ,शाहूवाडी(सहावा),विश्वास गुरव,तोदंलेवाडी(सातवा),वसंत कळेकर,कोरीवडे(आठवा),अशोक पवार, ममदापुर(नववा),सुशांत इंदुलकर, दिंडेवाडी(दहावा). असे क्रमांक आले. कार्यक्रमाचे सुत्रसचांलन आनंदा भोसले व आभार जिद्दी ग्रुपचे अध्यक्ष . श्री. विठ्ठलराव पाटील यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published.