श्री दुधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखाना निवडणूक तारखेकडे कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष : शैलेंद्र उळेगड्डी

श्री दुधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखाना निवडणूक तारखेकडे कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष

कडगाव/शैलेंद्र उळेगड्डी
बिद्री येथील श्री दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या वाढीव सभासदावरून गेली अडीच वर्ष न्यायालयीन लढे सुरू होते. या वाढीव सभासदांची छाननी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने पूर्ण झाली आहे. निवडणूकीसाठीची अंतिम यादी गुरुवार दि. ३१ रोजी प्रसिद्ध करण्यात आली. बिद्री साखर कारखान्याचे चार तालुक्याचे कार्यक्षेत्र असून २२३ गावे समाविष्ट आहेत. राधानगरी – १८१६९, कागल- १५१६९, भूदरगड- २०९५९ व करवीर तालुक्यात ३५१२ सभासद आहेत. वाढीव सभासदांचा पात्र- अपात्रतेचा मुद्दा निकालात निघाला असून निवडणूक प्रक्रीयेला वेग आला आहे. अंतीम यादी जाहिर झाली असून आता सभासदांसाह सामन्य जनतेचे निवडणूक तारखेकडे लक्ष लागून राहिले आहे.
५७ हजार ८०९ ‘अ’वर्ग सभासदाची निवड झाली आहे. ‘ब’ वर्ग संस्थागट १०४१ व व्यक्ती सभासद ९ असे एकूण १०५० मतदार असणार आहेत.
कारखान्याच्या निवडणूकीची अधिसूचना जाहीर झाल्यामुळे राजकीय गटातील कार्यकर्त्यात चैतन्य पसरले आहे.प्रमुख दोन्ही गटा सह छोटे मोठे गट संघटनांचे नेतेमंडळी प्रचाराला लागून कार्यक्षेत्रातील चार तालुक्यातील बहुसंख्य गावात संपर्क सभा मेळावे घेऊनआपली भूमिका सभासदांपर्यंत पोहचविण्याचे काम करत आहेत.आरोप-प्रत्यारोपांनी कार्यक्षेत्र दणाणून जात आहे.यात प्रामुख्याने राधानगरी-भुदरगड च्या आमदार प्रकाशराव आबिटकर व माजी आमदार के.पी.पाटील यांच्या मधील कलगीतुरा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
सत्ताधारी माजी आमदार के.पी.पाटील यांच्या कडून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील,प्रविनसिंह पाटील,जी.प.सदस्य जीवन पाटील,पंडितराव केणे, धनाजीराव देसाई, मधुकर देसाई आदी नेतेमंडळी आघाडीवर असून विरोधी आमदार प्रकाशराव आबिटकर यांच्या कडून माजी आमदार दिनकरराव जाधव,माजी व्हाईसचेअरमन विजयराव मोरे,के.जी.नांदेकर, बी.एस.देसाई,दत्तात्रय उगले आदी नेते मंडळी आघाडीवर दिसत आहेत.
चार तालुक्याचे कार्यक्षेत्र आसले तरी बिद्रीच्या राजकारणाचे पडसाद जिल्ह्याच्या राजकारणावरवर पडत असतात.स्वर्गीय माजी खासदार सदाशिव मंडलिक व शाहू कारखान्याचे चे सर्वेसर्वा स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे हे पारंपरिक राजकीय शत्रू देखील याच बिद्रीच्या निवडणुकीत एकत्र आले होते त्या वेळी पासून जिल्ह्याच्या राजकारणात दुरोगामी परिणाम करणारी निवडणूक म्हणून बिद्री साखर कारखाना निवडणुकीकडे पाहिले जाते.
बिद्रीच्या कार्यक्षेत्रातील करवीर,कागल व राधानगरी आशा तीन आमदारांचे भवितव्य ठरवणारी व सर्वच प्रमुख गट-तट,पक्षांच्या कार्यकर्त्यांची राजीकय सोय म्हणून या कारखान्याच्या निवडणुकीकडे आख्या जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
बिद्री कारखाना जरी कागल तालुक्यात येत असला तरी या कारखान्यावर आज पर्यंत भूदरगडचेच वर्चस्व राहिले आहे.बऱ्याच वेळा भुदरगड-राधानगरी चा आमदारकी देखील या निवडणुकीच्या समीकरणावर अवलंबून राहत असल्याने भुदरगड-राधानगरी चे आजी-माजी आमदार ताकतीने या निवडणुकीत आपले प्रतिष्ठा पणाला लावत असतात .विधानसभेच्या संभाव्य उमेदवाराचा बिद्रीच्या माळावर पराभव केला की विधानसभेची निवडणूक सोपी जाते असा आज पर्यंतचा इतिहास असल्याने बरेच विधानसभेचे उमेदवार या निवडणुकीत विधानसभेची रंगीत तालीम म्हणून पूर्ण ताकदीनिशी लढवत असतात.
या वेळीची निवडणूक पत्र-अपात्र सभासदांच्या सर्वोच्च न्यायालया पर्यंतच्या लढाई मूळे फारच चर्चेत आली आहे.सर्वच प्रमुख नेत्यांनी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच एकमेकांवर इतक्या टोकाच्या टीका केल्या आहेत की ही येणारी निवडणूक संघर्षमय-चुरशीची होणार असे वाटत असून निकाल काय लागणार याचा अंदाज वर्तवणे राजकीय समीक्षकांनाही महाकठीण होऊन बसले आहे. शेवटी मतदार राजा काय करणार या वरच आजी-माजी आमदार व संचालकांचे भवितव्य अवलंबून राहिल.

Leave a Reply

Your email address will not be published.