कल्याण पूर्वेत यंग डॉक्टरचा डेंग्यूने मृत्यु : आकाश सहाणे

कल्याण पूर्वेत यंग डॉक्टरचा डेंग्यूने मृत्यु

कल्याण , ( आकाश सहाणे ) : कल्याण पूर्वेतील चिकणी पाडा येथे रहाणारा राजनी यादव या ३० वर्षीय युवक डॉक्टरचा डेंग्यूच्या आजाराने दुदैवी अंत झाला आहे .

राजनी यादव याने नुकतीच  बी . एच .एम. एस . ही डॉक्टरची पदवी संपादन  होती .
रजनी याने  सध्या एम .पी. एस . सी . साठी ही प्रयत्न सुरू केले होते .
गेल्याच आठड्यात त्याला ताप आल्याने कल्याणच्या एका खाजगी रुग्णालयात औषधोपचारासाठी दाखल केले होते . दरम्यान राजन यास डेंग्यु या रोगाची लागन झाल्याचे निष्पन्न झाले होते .
औषधोपचारादरम्यानच आज सकाळी ९ चे दरम्यान त्याची प्राण ज्योत मालवली .

डॉक्टरी नंतर  रजनी  एम . पी . एस . सी . खुली परिक्षा पास झाला होता . येत्या १६ तारखेला त्याची एम पी . एस ची अंतिम परिक्षा होती .

डॉक्टर आणि उच्च प्रशासकीय अधिकारी होऊन गगनभरारी घेऊ इच्छीणाऱ्या राजनी याचा डेंग्यू आजाराने दुदैवी  मृत्यु झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.