धनाजीराव देसाई फौंडेशनचे काम आदर्शवत __ प्रविणसिंह पाटील  झिम्मा फुगडी स्पर्धेत धनलक्ष्मी महिला मंडळ  प्रथम : शैलेंद्र उळेगड्डी

धनाजीराव देसाई फौंडेशनचे काम आदर्शवत __ प्रविणसिंह पाटील 
झिम्मा फुगडी स्पर्धेत धनलक्ष्मी महिला मंडळ  प्रथम

कडगाव/शैलेंद्र उळेगड्डी
धनाजीराव देसाई फौंडेशनने सामाजिक सलोखा राखत विविध उपक्रम  राबवून आदर्शवत काम केले असल्याचे प्रतिपादन बिद्रीचे माजी उपाध्यक्ष प्रविण पाटील यांनी केले .
ते कडगांव (ता.भुदरगड )येथे धनाजीराव देसाई फौंडेशनच्या वतीने आयोजित झिम्मा फुगडी स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी बोलत होते. माजी सभापती धनाजीराव देसाई अध्यक्षस्थानी होते. स्पर्धेचे उद्धघाटन विक्रीकर उपायुक्त बिंदीया मोहीते- पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्धघाटन झाले . माजी जि.प.सदस्या सुनिता देसाई , पंडित केणे, सुनिल कांबळे , सुलोचना कोरगांवकर , माजी सरपंच शिवाजीराव देसाई प्रमुख उपस्थित होते.
स्पर्धेत अनुक्रमे विजेते असे : धनलक्ष्मी महिला मंडळ  पंडेवाडी ता,राधानगरी,बाळूमामा महिला मंडळ घोटवडे ,माउली महिला मंडळ  कासारवाडा ,नागनाथ महिला मंडळ ,सोनाळी, ता कागल,प्रगती महिला मंडळ पंडेवाडी ,झाशीची राणी युवती  मंच करडवाडी ,महालक्ष्मी महिला मंडळ पारदेवाडी,अंबाबाई महिला मंडळ ,फणसवाडी,नवश्यमाऊली महिला मंडळ ,दारवाड,मंगळागौरी महिला  पाळ्याचाहुडा , उतेजानर्थ – वेदगंगा महिला मंडळ खानापूर,अष्टविनायक महिला,उंदरवाडी,मरगुबाई महिला चोपडेवाडी, रामलिंग महिला नवले, प्रियदर्शनी महिला बोळावी,उत्कृष्ट गायन -आरती पाटील
बोळावी,  उत्कृष्ट  उखाणा- गीता वेतुर्लेकर,उत्कृष्ट वेशभूषा _स्त्रीशक्ती महिला  नांदोली,
या वेळी बोलताना धनाजीराव देसाई म्हणाले, पारंपारिक सण साजरे करण्याचे श्रेय महिलांना जाते,आज लोप होत चाललेली संस्कृतीचे जतन करणे आवश्यक आहे.
परीक्षक म्हणून सुनील खोत, सदाशिव करडे, संतोष भोसले यांनी काम पाहिले
बाळासाहेब भालेकर यांनी स्वागत केले. शैलेंद्र उळेगड्डी यांनी प्रास्ताविक केले.यावेळी गोकूळ संचालक विलास कांबळे,पंडित केणे, सुनिल कांबळे ,माजी सभापती सुलोचना कोरगांवकर , शिवाजीराव देसाई,काकासो देसाई ,डॉ.नवज्योत देसाई  उपसरपंच शहाजी देसाई , प्रकाश डेळेकर ,के एन पाटील,काशिनाथ देसाई,सुनिल खोपडे, काकासो राणे ,संयोगीता मनगुतकर, सिंधुताई दबडे ,विजया देसाई , सजाक्का कांबळे ,स्वाती देसाई , एेश्वर्या सोनार, हेमलता देसाई ,अहमद खान, ईश्वरा रेपे, बाळासाहेब देसाई , सुनिल चव्हाण, भिकाजी पाटील, पिंटू चौगले,सचिन चव्हाण , विजयप चौगले ,शैलेश देसाई,संजय देसाई  यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले
शिवाजी पाटील यांनी सुत्रसंचालन केले  राजेन्द्र देसाई यांनी आभार मानले

Leave a Reply

Your email address will not be published.