शेतकरी कर्ज माफी मिळणार का? प्रक्रियेत तृटीः धनाजीराव देसाई : शैलेंद्र उळेगड्डी

शेतकरी कर्ज माफी मिळणार का? प्रक्रियेत तृटीः धनाजीराव देसाई

 

कडगाव/शैलेंद्र उळेगड्डी
शासनाच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी’सन्मान योजने मधून शेतकऱ्यांना कर्ज माफी करिता ऑनलाइन फॉर्म भरणे सुरू आहे, ग्रामीण भागात महा इ सेवा(सेतू)मधून फॉर्म भरणे प्रक्रिया सुरू आहे.या ऑनलाइन फॉर्म प्रक्रिये मध्ये काही त्रुटी असून त्यामुळे शेतकऱ्यांन मध्ये कर्जमाफी मिळणार की नाही असा  संभ्रम निर्माण झाला असून ऑनलाइन फॉर्म मधील त्रुटी प्रशासनाने दूर कराव्यात अशी मागणी माजी सभापती धनाजीराव देसाई यांनी केली. तांबाळे (भुदरगड) येथे झालेल्या बैठकीत केली .यावेळी हरिदास देसाई, तुकाराम भूतल आदी प्रमुख उपस्थिती होते.

पुढे बोलताना श्री देसाई यांनी या ऑनलाइन कर्जमाफी फॉर्म भरण्या मध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागात ‘सर्व्हरडाऊन’ होण्याची समस्यां नेहमीच भेडसावत असल्याने महाइसेवा केंद्रासमोर शेतकऱ्यांना दिवसभर ताटकळत उभा राहावे लागत आहे.मयत कर्जदार शेतकरी यांच्या बाबत फॉर्म भरण्याची नेमकी माहिती मिळत नाही.मयत झालेल्या शेतकरी कुटुंबातील वारसामध्ये कर्जमाफी मिळणार की नाही अशी चिंता व्यक्त होत आहे.तसेच काही शेतकऱ्यांच्या आधारकार्ड मधील हाताचे ठस्से दिसत नाहीत अशा अनेक समस्यांनी शेतकरी कर्जमाफी मिळणार की नाही म्हणून चिंताग्रस्त असून कर्जमाफी प्रक्रिया सुलभ पार पडण्याकमी विशेष प्रयत्न शासनस्तरावर व्हावेत अशी मागणी केली.

या वेळी तमास पिंटो, आर.के.देसाई,नंदकुमार ठाकूर,वसंत देसाई,धनाजी वांजोळे,अहमद खान,ईसा शेख,पंढरीनाथ मेंगाने,बळवंत सुखे,पांडुरंग चांदम,शांताराम एरम, मारुती मोरे,उत्तम पाटील आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.