महानगरपालीका व ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे वयोवृद्ध नागरिक दुर्घटनाग्रस्त : श्याम जांबोलीकर

महानगरपालीका व ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे वयोवृद्ध नागरिक दुर्घटनाग्रस्त

उल्हासनगर , ( श्याम जांबोलीकर ) : उल्हासनगर मध्ये गणेश नगर परिसरात रस्त्याचे काम उल्हासनगर महापालिकेने भरत कंट्रेक्शन चे आकाश चंदनानी यांना दिले आहे , चंदनानी यांनी अशोक अनिल टॉकीज ते खत्री भवन व खत्री भवन ते 3 नंबर ओटी पर्यंतच्या रोडचे काम करायचे आहे . साधारणता त्यांनी अर्ध्या रस्त्याचे कामाला सुरुवात करून अर्धा रस्ता नागरिकांच्या रहदारीसाठी खुला ठेवायला हवा होता कारण रोज हजारो नागरिकांची ह्या रस्त्यावर वर्दळ असते पण ह्या महाभागाने हजारो नागरिकांच्या त्रासाची पर्वा न करता पुर्ण रस्ता खोदून ठेवला आहे आणि त्यामुळे नागरिकांना अतिशय लांबचा फेरा मारून आपल्या गंतव्य स्थानी जावे लागत आहे .
ह्या ठेकेदाराच्या आणि मनपाच्या अधिकार्यांचे हलगर्जीपणाचा कळस म्हणजे त्या खोदून ठेवलेल्या रस्त्यावर ” काम चालु रस्ता बंद ” असा एक साधा फलक ही लावायची तसदी त्यांनी घेतलेली नाहीये . त्यामुळे नवीन माणसं लांबचा फेरा वाचायला त्या खोदून ठेवलेल्या रस्त्याने जातायेत व हकनाक अपघाताला बळी पडत आहेत . बर्याच लहान मुलं , महिला व वयोवृद्ध पादचारी ह्या खोदलेल्या रस्त्याच्या खड्डयात पडून जखमी झाले आहेत अशी स्थानिक नागरिकांची तक्रार आहे .
याच मालिकेत श्री नानिक वासवानी हे वयोवृद्ध व्यक्ती एक्टिवा गाडीने जात असताना काहीही फलक न दिसल्याने व कोणी कामगारांनी न थांबवल्यामुळे त्या खोदून ठेवलेल्या रस्त्याने गेले व खड्डयात गाडी गेल्याने पडून गंभीर जखमी झाले व त्यांचा हात मोडला आहे अशी माहिती स्थानिक सामाजिक कार्यकर्ते श्री संतोष वाल्मिकी यांनी दिली . जेव्हा ह्या अपघाताची माहिती संतोष यांना मिळाली तेव्हा त्यांनी आपल्या कार्यकर्ते सोबत जावुन दुर्घटनाग्रस्त व्यक्तीला तात्काळ महापात्रा हॉस्पिटल येथे नेले . तिथे डॉक्टरांकडून तपासणी झाल्यावर समजले की गंभीर मार लागल्याने हाताला फ्रक्चर झालं आहे व अॉपरेशन करावे लागेल .

श्री संतोष वाल्मिकी व त्यांच्या कार्यकर्तयांनी तसेच स्थानिक नागरिकांनी ” महाराष्ट्र तेज न्युजशी ” बोलताना मागणी केली आहे की ह्या व अश्या अनेक अपघातांना जबाबदार निष्काळजी ठेकेदार व संबंधित मनपा अधिकारी व कर्मचार्यांवर गुन्हा दाखल करुन त्यांना निलंबित करण्यात यावे नाहीतर ह्या पेक्षा मोठा अपघात होऊन जिवीत हानी होऊ शकते . श्री संतोष वाल्मिकी व त्यांचे कार्यकर्ते स्थानिक नागरिकांच्या सोबत मिळून ह्या विरोधात आंदोलन करणार असल्याची माहिती संतोष वाल्मिकी यांनी दिली .

Leave a Reply

Your email address will not be published.