पश्चिम भुदरगड मध्ये थेट सरपंच पदासाठी धुमशान : शैलेंद्र उळेगड्डी

पश्चिम भुदरगड मध्ये थेट सरपंच पदासाठी धुमशान

 

 

कडगाव /शैलेंद्र उळेगड्डी : भूदरगडच्या कडगाव-मठगाव या अतिमहत्त्वाच्या जिल्हापरिषद मतदार संघात कडगाव,तिरवडे,वेंगरुळ,वेसर्डे या प्रमुख गावांसह चौदा ग्रामपंचायत निवडणुका होत आहेत.या सर्वच गावांच्या निवडणूक प्रक्रिये मध्ये आरक्षित व खुल्या सर्वच ठिकाणी इच्छुकांची भाऊगर्दी असून उमेदवार ठरवणे स्थानिक नेत्याना अडचणीचे ठरत आहे.
प्रथमच होणाऱ्या थेट सरपंच निवडी मुळे सदस्यपदाच्या आपल्या वार्डात आरक्षण असल्याने काही इच्छुक थेट सरपंच पदासाठी उडी घेत असल्याने सरपंच पदाचा उमेदवार ठरवणे स्थानिक नेत्याना अडचणीचे ठरणार आहे.सरपंचपदाच्या सर्वच प्रवर्गातील इच्छुकांची संख्या भरपूर प्रमाणात असल्याने ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध होण्याच्या शक्यता कमी झाल्या आहेत.

ग्रामपंचायत वसुली मध्ये वाढ.

ग्रामपंचायत निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना ग्रामपंचायतची सर्व देणी भागवणे गरजेचे असल्याने इतर वेळी वसुलीस प्रतिसाद न देणारीही मंडळी स्वतः ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन आपला घरफाळा,पाणीपट्टी भरत असल्याने ग्रामपंचायत वसुली मात्र उत्तम प्रकारे होत आहे.

पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतल्याने बिद्री साखर कारखाना व ग्रामपंचायत आशा दोन्ही निवडणुकीची पार्श्वभूमीवर रात्रीच्या परावरच्या गप्पाना उत येऊन वातावरण चांगलेच ढवळून निघत आहे.

इच्छुक उमेदवार गटाच्या जुळवाजुळवी कडे फार गांभीर्याने न पाहता थेट मतदारांपर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नात दिसत आहेत.तर स्थानिक गट प्रमुख विविध डावपेच आखत सरपंच व सदस्य आपल्याच विचाराचे होतात काय हे पाहण्यासाठी विविध गट,तट, पक्ष आदींच्या संपर्कात राहून चर्चा, बैठकीत मग्न दिसत आहेत.

इच्छुक उमेदवारांची मुंबई भेट.

या विभागातील सर्वच गावातील तरुण व गावाकडे विशेष लक्ष असणारी काही मातब्बर मुंबई मध्ये स्थायिक असल्याने थेट सरपंच निवडीमुळे प्रत्येक मुंबईकरांच्या मताची गरज असल्याने काही प्रमुख इच्छुक उमेदवार मुंबई कडे रवाना झाल्याचे दिसत आहे.तर पश्चिम भुदरगड मधील जिल्ह्याच्या प्रमुख शिखर संस्थेचे एक संचालक मुंबईतच काही दिवस ठाण मांडून असल्याचे समजते.
या विभागात पक्षीय राजकारणापेक्षा गटांना अतिमहत्व असते परंतु या वर्षी पहिल्यांदा भाजप,शिवसेना या पक्षासोबत शेतकरी संघटना यांनी देखील या निवडणुकी मध्ये अधिक स्वारस्य दाखवल्याने राष्ट्रवादी,राष्ट्रीय काँग्रेस, सेना, भाजप,संघटना अशाच पद्धतीने ही निवडणूक होणार अशी चिन्हे दिसत आहेत.

चौकट:-पक्ष,गट,तट याकडे प्राधान्याने लक्ष
न देता पैपाहुणे,भाऊबंदकी,शेजारी आदींच्या जुळवाजुळविकडे प्राधान्याने लक्ष दिले जात असून या सर्वच स्तरावरील मातब्बर उमेदवाराच्या शोधात प्रत्येक गट,पक्ष दिसत आहे.
या जिल्हापरिषद मतदार संघात कडगाव,शेळोली,अंतीवडे,अंतुर्ली,अनफ खुर्द,कारीवडे,तांबाळे,तिरवडे, देवर्डे,देऊळवाडी,पडखंबे, पारदेवाडी,वेंगरुळ,वेसर्डे येथील निवडणुका होत असून कडगाव,कारीवडे,वेंगरुळ या गावांच्या निवडणुका लक्षवेधी ठरणार आहेत.सरपंच थेट निवड असल्याने मतदारांमध्ये उत्साह दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.