उल्हासनगरातील बेकायदेशीर बांधकामाचा उच्छाद काही थांबेना …. मनपा आयुक्त हतबल की निगरगट्ट ??? तुम्ही करा तक्रारी मी घालतो कचर्याच्या टोपलीत !!! : गौतम वाघ

उल्हासनगरातील बेकायदेशीर बांधकामाचा उच्छाद काही थांबेना ….
मनपा आयुक्त हतबल की निगरगट्ट ??? तुम्ही करा तक्रारी मी घालतो कचर्याच्या टोपलीत !!!

 

 

उल्हासनगर, ( गौतम वाघ ) :
उल्हासनगर शहर हे व्यापारी शहर म्हणुन विख्यात आहे. तसेच बेकायदेशीर बांधकामांचे अनियमित, अनियंत्रित शहर म्हणुनही कुख्यात आहे. अनेक मनपा आयुक्त या शहरात आले आणि यावर नियंत्रण करण्याच प्रयत्न करुन गेले. काही हात टेकुन गेले तर काही खिसे भरुन गेलेत. राजकीय नेते व प्रभाग समितीतील अधिकारी ते मुकादमांच्या आशिर्वादाने दुर्दैवाने ही बांधकामे सर्रास चालु आहेत.बरेचसे अधिकारी स्वतःचा रेट वाढविण्यासाठी आधी काही बेकायदेशीर बांधकाम निष्कासनाची कारवाई करतात, आणि ईच्छित साध्य झाले की पुन्हा डोळेझाक करतात. पर्यायाने गल्लीबोळातले दादा, पक्षाचे पदाधिकारी, आपल्या नेत्यांच्या सावलीत हा धंदा तेजीत करतात. कोणत्याही प्रशासकीय परवानगी व स्थापत्य विशारदांच्या सल्ल्याशिवाय उभी राहणारी ही बांधकामे अनेकदा ढासळुन अनेक निष्पाप जीव गेले आहेत.
आयुक्त निंबाळकर यांनी बेकायदेशीर बांधकामांच्या तक्रारी ऐकण्यात काडीचेही स्वारस्य नाही. याचा गैरफायदा घेत प्रभाग अधिकारी यांच्या प्रभागात बेकायदेशीर बांधकामे राजरोस पणे सुरू आहेत.
मागे, आयुक्त राजेंद्र निंबाळकरांनी दिलेल्या आदेशानंतर पाडकाम केलेले बांधकाम आयुक्तांचा आदेश पायदळी तुडवित प्रभाग अधिकार्यांनी बांधकामांना पुन्हा हिरवा कंदील देऊन सुरु करण्यात आले आहे. हे आश्चर्यकारक मुळीच नाही, कारण अशी शेकडो बांधकामे पुन्हा उभी राहिली आहेत. आयुक्त राजेंन्द्र निंबाळकर यांनी समाजमाध्यमातुन बेकायदेशीर बांधकामांच्या तक्रारी थेट मांडण्याचे आवाहन करुनही भुमाफिया ठेकेदारांना प्रशासनाची भिती वाटत नसल्याने प्रशासनाचीच भुमिका आता संशयाच्या भोवर्यात सापडली आहे. यावर आयुक्त परिणामकारक पवित्रा घेतायेत की मुग गिळुन गप्प बसतायेत हे लवकरच स्पष्ट होणार  आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.