बर्डस् अबोड’ या पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन : अमित कांबळे

‘बर्डस् अबोड’ या पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

 

 

मुंबई, ( अमित कांबळे ) : दुर्मिळ पक्ष्यांच्या शास्त्रीय माहितीसाठी श्रीमती मंजुला माथूर यांच्या चित्रांवर आधारित ‘बर्डस् अबोड’ हे पुस्तक उपयुक्त असून सर्व दुर्मिळ जातींच्या पक्ष्यांची शास्त्रीय माहिती या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात आली आहे, असे उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित पुस्तक प्रकाशन समारंभप्रसंगी काढले.

या पुस्तकाचे कौतुक करुन मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, मी स्वत: वन्यजीव प्रेमी आहे. वन्य जिवांचे संरक्षण व संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. या पुस्तकात भारतभरातील ८०हून जास्त पक्ष्यांच्या छायाचित्रांचा समावेश असून ही सर्व छायाचित्रे श्रीमती माथूर यांनी स्वत: काढली आहेत. याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले.

या पक्ष्यांच्या छायाचित्रासह पक्ष्यांचे वर्गीकरण, शास्त्रीय नाव व यासह कोणत्या कॅमेऱ्याने छायाचित्र टिपले आहे त्याची सखोल माहिती दिली आहे. दुर्मीळ पक्ष्यांचे अनेक सुंदर छायाचित्रांचा या कॉफी टेबल बुक मध्ये समावेश आहे.

यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविणसिंह परदेशी, पोलीस महासंचालक सतीश माथूर, डॉ. फिरोजा गोदरेज, रवी त्रेहान, बिट्टू सेहगल आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.