आमदार डी.पी.सावंत च्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन  राजा सम्राट आशोक यांची तुलना आशोक चव्हाण यांच्याशी करून तोडले अकलेचे तारे : कालीदास अनंतोजी

आमदार डी.पी.सावंत च्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन 
राजा सम्राट आशोक यांची तुलना आशोक चव्हाण यांच्याशी करून तोडले अकलेचे तारे 

 

बिलोली /कालीदास अनंतोजी :
काॅग्रसचे माझी मंत्री तथा नांदेड चे आमदार डि.पी.सावंत यांनी नांदेड येथिल एका प्रचार सभेत माझी मुख्यमंत्री आशोकराव चव्हाण यांची तुलना राजा सम्राट आशोक यांच्या शी तुलना करून आक्लेचे तारे तोडल्याने समाज बांधवात संतापाची लाट ऊसळली आहे.
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौक चिटमोगरा ता. बिलोली जि.नांदेड येथे समाज बांधवाच्या वतिने आक्लेचे तारे तोडनार्या व आशोकराव चव्हाण यांची हुजेगीरी करनार्या आमदार डी.पी.सावंतच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
प्रचार सभेतील भाषणात सावंत म्हणालेकी  मा.मुख्यमंत्री आशोकरावजी चव्हाण साहेब यांनी बावरी नगर दाबड येथे आर्थिक निधी देवुन सम्राट आशोक यांच्या सारखे बौध्द धम्माचे कार्य करीत आहेत. आसे म्हणून आक्लेचे तारे तोडल्याने बौध्द समाजात संतापाची लाट ऊसळली व ठिक ठिकाणी निषेध व प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात येत आहेत.
सावंत चा निषेध करताना आंबेडकरी चळवळीतील कार्यक्रते भास्कर भेदेकर चिटमोगरेकर म्हनाले की तथागत गौतम बुध्दांचा विज्ञानवादी धम्म राजा आशोक सम्राट यांनी बुध्दाला शरण जावुन अहींसेचा मार्ग स्वीकारला व आपल्या पोटच्या दोन मुलांना धम्म प्रचारासाठी दान म्हणून दिले व स्वतः धम्मदिक्षा घेतली. त्यानंतर डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे लाखो जनसमुदाया सह धम्मदिक्षा घेवुन दुसरी धम्म क्रांती केली.
पुढे बोलताना भेदेकर म्हनाले की मा.मुख्यमंत्री आशोकरावजी चव्हाण साहेबांनी आगोदर लाखो लोकांना सोबत घेवुन धम्मदिक्षा घ्यावे व आपल्या दोन मुलांना धम्म प्रचारासाठी द्यावे नंतर कुठेतरी राजा सम्राट अशोकांच्या व डाॅ. बाबासाहेबांच्या पायत्या पर्यंत पोहचाल आसे भेदेकर यांनी डि.पी.सावंतला ऊदेशुन म्हणाले.
निषेध व सावंतच्या पुतळ्याचे दहन करताना भास्कर भेदेकर, हारीफुल भेदेकर, दिगांबर बोईवार,रंजित भेदेकर, राहुल भेदेकर,आमोल भेदेकर,ज्ञानेश्वर बक्कावाड,धम्मानंद भेदेकर, शंकर शेळके, मालोजि भेदेकर, शिल्पाबाई भेदेकर,निर्मलाबाई भेदेकर,प्रतिक्षा भेदेकर, प्रकाश भेदेकर आदींनी पुतळ्याचे दहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published.