महिला विशेष

प्रमुख सदन कॉम्प्लेक्समध्ये शेकडो दुर्गांनी भक्तीभावाने साजरा केला नवरात्रोत्सव

प्रमुख सदन कॉम्प्लेक्समध्ये शेकडो दुर्गांनी भक्तीभावाने साजरा केला नवरात्रोत्सव

अंबरनाथ : अंबरनाथ पश्चिम येथील महात्मा ज्योतिबा फुले नगर मधील प्रमुख सदन कॉम्प्लेक्समध्ये शेकडो दुर्गांनी भक्तीभावाने पूजा करून नवरात्रोत्सव साजरा करण्यात आला असून अष्टमीला कन्या पुजन करून प्रसाद वाटप करण्यात आले व भव्य गरबा रासेचे आयोजन करण्यात आले व महिला वर्ग, बालगोपाल व तरूण तरुणींनी सहभागी होत मनमुराद आनंद लुटला. प्रमुख सदन कॉम्प्लेक्समध्ये प्रत्येक सण अत्यंत उत्साहात साजरा करण्यात येतो मग दिवाळी असो , होळी असो , मुस्लिम बांधवांची ईद असो की ख्रिस्ती बांधवांचा नाताळ असो सर्व अत्यंत उत्साहाने व एकोप्याने साजरे केले जातात तसेच शिवजयंती, बाबासाहेब आंबेडकर जयंती, गणतंत्र दिवस व स्वातंत्र्य दिवस प्रमुख सदन कॉम्प्लेक्स मधील रहिवासी उत्साहाने साजरा करतात .

सदर प्रसंगी उपस्थित महिलांनी महाराष्ट्र तेज न्यूज चॅनल चे आभार मानले व पुर्ण वर्षभर सांस्कृतीक कार्यक्रम आयोजित करून नवीन पिढीला प्रेरणा व प्रोत्साहन देण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.
Tags

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close