गडहिंग्लज फुटबॉल जत्रा !!! २७ पासून दिवाळी हंगाम !!!

गडहिंग्लज फुटबॉल जत्रा !!! २७ पासून दिवाळी हंगाम !!!

गडहिंग्लज प्रतिनिधी : गडहिंग्लज येथे २७ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन आयोजित अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धची तयारी अंतिम टप्यात पोहचली आहे. खेळाडूंच्या श्रमदानातून एम.आर. हायस्कूल मैदानाची दुरुस्तीचे काम सुरू आहे. लोकवर्गीणीतून होणाऱ्या गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल स्पर्धचे यंदाचे तेरावे वर्षे आहे. या स्पर्धेला केदारी रेडेकर संख्या समूह, हसन मुश्रीफ फौंडेशन, संजय घोडावत ग्रुप यांनी विशेष सहकार्य केले आहे.
यंदा मैदानावर हिरवळ ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या स्पर्धेसाठी तामिळनाडू, केरळ, पंजाब, गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील सोळा संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेकरिता दोन लाखांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. विजेत्या संघास ५१ हजार आणि युनायटेड करंडक, तर उपविजेत्यास ३१हजार आणि चषक, तिसऱ्या क्रंमाकास एकवीस हजार, चौथ्या संघास पंधरा हजारांची बक्षिसे दिली जाणार आहेत. यावेळी शिस्तबद्ध संघास अकरा हजार आणि चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेत विविध वैयक्तिक बक्षिसेही ठेवण्यात आली आहेत. यावर्षी या स्पर्धेसाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. महिला आणि जेष्ठ फुटबॉल खेळाडूंसाठी खास बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.