गडहिंग्लज’मध्ये शुक्रवारी अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धा

‘गडहिंग्लज’मध्ये शुक्रवारी अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धा

 

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन आयोजित अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेस उद्या ( शुक्रवार दि. २७ ऑक्टो. ) प्रारंभ होत आहे. या स्पर्धेचे हे तेरावे वर्ष आहे. या स्पर्धत महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, गोवा, कर्नाटक अशा पाच राज्यातील नामवंत संघांचा समावेश आहे. स्पर्धेसाठी दोन लाखांची पारितोषिके असून स्पर्धेची पूर्ण तयारी झाल्याची माहिती युनायटेडचे अध्यक्ष जगदीश पट्टणशेट्टी, उपाध्यक्ष संभाजी शिवारे यांनी दिली.
ते म्हणाले की, एम.आर. हायस्कूलच्या मैदानावर पाच दिवस या स्पर्धा होणार आहेत. उदया दिवसभरात तीन सामने होणार आहेत. सकाळी आठ वाजता पहिला सामना होईल. दुपारी एक वाजता केदारी रेडेकर संस्था समूहाच्या अध्यक्षा अंजनाताई रेडेकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्धाटन होणार आहे. साधना शिक्षण संस्थेचे सचिव जे.बी.बारदेस्कर यांचा अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमास हसन मुश्रीफ फौंडेशनचे अध्यक्ष नावीद मुश्रीफ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अरुण कलाल, सतीश घाळी, माजी महसूल अधिकारी दिनकर सावेकर, मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, विश्वास देवाळे, राजन पेडणेकर यांचीही प्रमुख उपस्थिती आहे

Leave a Reply

Your email address will not be published.