कुरणीत ७ नोव्हेंबर रोजी निकाली कुस्ती मैदान.हालसिध्दनाथ यात्रे निमित्त आयोजन.. शंभरहून आधिक होणार चटकदार कुस्त्या

कुरणीत ७ नोव्हेंबर रोजी निकाली कुस्ती मैदान.हालसिध्दनाथ यात्रे निमित्त आयोजन.. शंभरहून आधिक होणार चटकदार कुस्त्या

मुरगुड / प्रतिनिधी
महाराष्ट्रासह कर्नाटकातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान कुरणी ता कागल येथील श्री हालसिद्धनाथ यात्रेनिमित्त मंगळवार दि 7 नोव्हेंबर रोजी निकाली कुस्ती मैदान होत आहे प्रथम क्रमांकाची कुस्ती पै.संतोष लवटे (मोतीबाग) विरूद्ध पै.संतोष दोरवड (शाहू साखर) यांच्यात तर द्वितीय क्रमांकाची लढत पै. गुलाब आगरकर (क्रीडा प्रबोधनी ) विरूद्ध कुमार पाटील(मोतीबाग) या प्रमुख लढतीसह शंभरहून आधिक निकाली कुस्त्या होणार आसल्याची माहिती यात्रा कमिटीच्या वतीने देण्यात आली.
मैदान जि पच्या प्राथमिक शाळेच्या क्रीडांगणावर भरणार आहे. या निकाली कुस्ती मैदानात विजेत्या मल्लाना श्री हालसिद्धनाथ केसरी मानाची गदा व किताब देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. मैदानाचे पूजन श्री बाबुराव डोणे, पुजारी रावसो पुजारी यांच्या हस्ते होणार आहे राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते राम सारंग यांच्या मार्गदर्शनखाली कुस्ती मैदान होत आहे
या मैदानातील पुढील प्रमुख लढती कुस्ती शौकिनांसाठी पर्वणीच ठरणार आहेत
पै.बाबा रानगे(मोतीबाग) विरूध्द पै. रावसाहेब टिळे (शाहूपुरी) पै समाधान खताळ (कुस्ती संकूल) विरूध्द पै.सतिश अडसूळ (निढोरी)पै.अतुल डावरे बानगे(बानगे)विरूध्द पै.सुनिल खताळ(कुस्ती संकूल)पै.वृषभ पट्टणकुटी विरूध्द पै शहारूख मुल्लाणी (मोतीबाग)पै.वैभव पाटील(पाडळी) विरूध्द पै.दत्ता कुळवमोडे(व्हनाळी)पैओंकार पाटील (कुरणी) विरूध्द पै पवन गावडे (इचलकरंजी)अशा नामवंत मल्लांच्या शंभरहून आधिक निकाली कुस्त्या होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.