अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेत गोवा, चेन्नई, केरळ, पुणे उपांत्य फेरीत बंगळूर,पुणे, प्रॅक्टीस, युनायटेड पराभूत

अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेत गोवा, चेन्नई, केरळ, पुणे उपांत्य फेरीत
बंगळूर,पुणे, प्रॅक्टीस, युनायटेड पराभूत

गडहिंग्लज / प्रतिनिधी :  गडहिंग्लजमध्ये सुरू असलेल्या युनायटेड करंडक अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धत आज (रविवार) रोजी झालेल्या तिसऱ्या दिवशी चेन्नईचा एजीएस, पुण्याचा बीईजी, सेसा गोवा, केरला एफसी सघांनी आपआपल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करत उपात्यंफेरी गाठली. तर बंगळूर, प्रॅक्टीस, पुणे,गडहिंग्लज युनायटेड यांचे आव्हान संपुष्टात आले.
सकाळच्या सत्रातील पहिल्या रंगतदार सामन्यात पुणेच्या बीईजीने कोल्हापूरच्या प्रॅक्टीस क्लबचा ट्रायबेकरमध्ये ५-३ ने पराभव केला. पुणेच्या गोलरक्षक अरुणा दास याने दोन फटके अडवून विजयात सिंहाचा वाटा उचलला. चेन्नई एजीएसने बेंगळूरच्या डीवायएसएस वर एक गोल नोंदवून आगेकूच केली.
दुपारच्या सत्रात गोव्याच्या सेसा अकादमीने पुणे सिटी एफसीला एक गोलने नमवून उपात्यं फेरीत प्रवेश केला. पंधराव्या मिनिटाला गोव्याच्या कुणाल साळगांवकरने मैदानी गोल केला. पुणेच्या खेळाडूनी चांगला खेळ करत बरोबरी साधण्यासाठी अटोकाट प्रयत्न केले.
तर शेवटच्या उत्कंठावर्धक झालेल्या सामन्यात केरला एफसीने गडहिंग्लज युनायटेडचा १-० ने पराभव केला. शौकीनांच्या प्रोत्साहनावर युनायटेडने जिगरबाज खेळ केला. युनायटेडच्या गोलरक्षक निखील खन्नाच्या निष्काळजीपणाने गोल झाला. युनायटेड कडून ओमकार जाधव, मयूर पाटील, शकील पटेल, संदीप गोधळी, अमित सांवत, यासीन नदाफ यांनी चांगला खेळ केला. यावेळी सुधाकर (चेन्नई), माविया (बीईजी), रौनल गांवकर (गोवा), माईक (केरळा), शरणकुमार (बंगळूर) राहूल पाटील (प्रॅक्टीस), मुंइंरग (पुणे सिटी), मयूर पाटील (युनायटेड) यांना उत्कृष्ठ खेळाडू म्हणून गौरवण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published.