गगनबावडा येथील खो खो स्पर्धेत जय हनुमान गृप कोतोली, शिवराज गृप तिसंगी यांचे वर्चस्व

गगनबावडा येथील खो खो स्पर्धेत जय हनुमान गृप कोतोली, शिवराज गृप तिसंगी यांचे वर्चस्व

साळवण/ प्रतिनिधी
तिसंगी ( ता. गगनबावडा) येथे शिवस्वराज्य ग्रुप तिसंगीच्या वतीने खूला गट खो खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेचे उदघाटन जिल्हा परिषद सदस्य भगवान बापूसाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्राचार्य आर.डी. वाघरे, माजी सरपंच पांडुरंग खाडे, युवा नेते दगडु जाधव, बाबासो भोसले, सागर पाटील, किशोर कांबळे यांची प्रमूख उपस्थिती होती.
स्पर्धेमध्ये बारा संघानी सहभाग नोंदविला. यामध्ये जय हनुमान ग्रुप, कोतोली संघाने प्रथम क्रमांक पटकाविला, तर शिवस्वराज्य ग्रुप, तिसंगी संघाने द्वितीय क्रमांक मिळविला. उत्कृष्ट आक्रमक खेळाडू म्हणून विक्रम लव्हटे (कोतोली), तर उत्कृष्ट संरक्षक म्हणून अक्षय पांडुरंग पाटील(तिसंगी) यांची निवड करण्यात आली.
विजेत्या संघाना कुंभी धामणी धरण सोसायटीचे संचालक प्रकाश मोरे,माजी सरपंच आनंदा पाटील, महादेव कांबळे, पिंटू कांबळे यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाचे ७००१ रुपये व चषक, द्वितीय क्रमांकाचे ५००१ रुपये व चषक बक्षीस वितरण करण्यात आले.
या स्पर्धेसाठी प्रथम क्रमाकांचे बक्षीस शिवस्वराज्य ग्रुप यानी तर द्वितीय क्रमांकाचे बक्षीस शिवप्रसाद भगवान पाटील यांनी दिले.विनायक पाटील व मयूर शिंदे यांनी अनुक्रमे दोन्ही विजेत्या संघांना चषक दिले, तर उत्कृष्ट संरक्षक व उत्कृष्ट आक्रमक खेळाडु चे प्रत्येकी १०५१ रुपयांचे बक्षीस विनायक पोतदार यांच्या वतीने देण्यात आले. या स्पर्धेमध्ये पंच म्हणून जिल्हा स्तरीय पंच ए.डी.शिंदे,विजय पाटील यांनी काम पाहिले.
स्पर्धेचे समालोचन उमेश सावंत, समीर पाटील यांनी केले. या स्पर्धेचे आयोजन शिवस्वराज्य ग्रुपचे स्वप्नील पाटील, अक्षय पाटील, अमर जाधव यांनी केले.

तिसंगी : येथे शिवस्वराज्य ग्रुपच्या वतीने आयोजित खूला गट खो -खो स्पर्धेचे उदघाटन करताना जिल्हा परिषद सदस्य भगवान पाटील सोबत प्राचार्य आर.डी.वाघरे, माजी सरपंच पांडुरंग खाडे, दगडू जाधव, बाबासो भोसले, प्रकाश मोरे व अन्य मान्यवर

तिसंगी : येथे शिवस्वराज्य ग्रुपच्या वतीने आयोजित खूला गट खो -खो स्पर्धेचे विजेत्या संघाना प्रथम व द्वितीय क्रमांकाचे बक्षीस वितरण करताना कुंभी धामणी धरण सोसायटीचे संचालक प्रकाश मोरे सोबत महादेव कांबळे, मयूर शिंदे व अन्य मान्यवर

Leave a Reply

Your email address will not be published.