भुदरगड पोलिसांकडून अभिनव ऊपक्रम. जेष्ठ नागरिकांच्या स्पर्धेत प्रथम बाबुराव माने प्रथम

भुदरगड पोलिसांकडून अभिनव ऊपक्रम.
जेष्ठ नागरिकांच्या स्पर्धेत प्रथम बाबुराव माने प्रथम

गारगोटी प्रतिनिधी :
जेष्ठ नागरिकांसाठीच्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून
भुदरगड पोलिस ठाणे गारगोटी यांच्या वतीने मॉर्निंग वॉक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत प्रथम क्रमांक बाबुराव माने यांनी पटकविला. तर द्वितीय क्रमांक रंगराव खामकर, तृतीय पाडुरंग देसाई यांनी पटकाविले.
तहसीलदार अमरदिप वाकडे ,पोलिस निरीक्षक अरविंद चौधर ,उपनिरीक्षक अनंत कांबळे, डॉक्टर के. ए. मोमीन, प्राचार्य मिलिंद पंगिरेकर यांच्या उपस्थित सकाळी सात वाजता स्पर्धेला सुरवात झाली.
स्पर्धेला सुरवात पोलिस परेड ग्राउंड वरुन सुरवात झाली. गारगोटी शहराच्या इंजुबाई पानंदी मार्गे ,मराठा चौक, आबिकटर कॉंप्लेस , हुतात्मा चौक असा या स्पर्धेचा मार्ग होता.
पोलिस निरक्षक अरविंद चौधरी म्हणाले गारगोटी सारख्या मोठ्या शहरांमधून अनेक युवा गट आणि ज्येष्ठ नागरिक मदत गट संयुक्त विद्यमाने वृध्दांना दिलासा देण्याचे काम करत आहेत. परंतु मुळातच घरातील विसंवाद टाळले, त्यामुळे वृध्दत्वात येणारे नैराश्य, एकटेपण, शारीरिक किंवा मानसिक दौर्बल्य यांसाठी वेळीच वैद्यकीय उपचार केले, समुपदेशन घेतले तर त्यामुळेही पुढील समस्या टळू शकतील.
यावेळी चालणे स्पर्धेत प्रथम क्रमांक बाबुराव माने,द्वितीय क्रमांक रंगराव खामकर,तृतीय पाडुरंग देसाई यांनी पटकाविले विजेता व स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वांचे पुष्पगुच्छ देवून मान्यवरांच्या हस्ते कौतुक करण्यात आले.

स्नेह क्लिनिक गारगोटी यांच्या रुग्णवाहिकेचे सहकार्य लाभले.
माजी प्राचार्य बी. बी. सोळसे, पी.टी.लोखंडे, डी. के. चव्हाण, बरगेसर , श्रीकांत शहा, एम.आर.टिपूगडे, एस.टी.बाबर, सुनील पिळणकर, ए.के.कांबळे, मधुकर शिंदे, रघुनाथ चौगले, संदीप लाड, संतोष भांदीगरे, सरिता देवर्डेकर, सरिता तांबेकर, तेजश्री चौगले, रामचंद्र पाटील, पंकज कारडे आदि स्पर्धेत सहभाग घेतला होता.आभार तात्यासो पाटील यांनी मानले.

फोटो ओळ–
गारगोटी:येथील चालने स्पर्धेत प्रथम क्रमांक आलेले जेष्ठ नागरिक बाबुराव माने यांचे आभिनंदन करताना तहसीलदार अमरदीप वाकडे , पोलिस निरक्षक अरविंद चौधरी आदी .

Leave a Reply

Your email address will not be published.