गारगोटीतील हुतात्म्यांना आभिवादन करण्यासाठी लोटला जनसमुदाय : गारगोटी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केली ‘रात्र बलिदानाची’ नाटिका

गारगोटीतील हुतात्म्यांना आभिवादन करण्यासाठी लोटला जनसमुदाय : गारगोटी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केली ‘रात्र बलिदानाची’ नाटिका

गारगोटी प्रतिनिधी : गारगोटी कचेरीवर १३ डिसेंबर १९४२ ला झालेल्या हल्ल्याच्या घटनेला ७५ वर्षे झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज गारगोटी येथे विविध कार्यक्रमांनी क्रांतीदिन साजरा करण्यात आला. गारगोटी हायस्कूल व श्री.समर्थ ज्युनि.कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी गारगोटी कचेरीवर हल्ल्याच्या स्मृती जागृत करण्यासाठी ‘रात्र बलिदानाची’ ही नाटिका सादर करण्यात आली. शाहू कुमार भवन व कर्मवीर हिरे कॉलेजमधील राष्ट्रीय छात्रसेनेच्या कॅडेटनी क्रांती ज्योतीस मानवंदना दिली.
‘रात्र बलिदानाची’ नाटिकेचे उद्घाटन सिनेअभिनेते विलास रकटे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी तहसीलदार अमरदीप वाकडे होते. या नाटिकेच्या माध्यमातून गारगोटी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी १३ डिसेंबर १९४२ ला झालेल्या हल्ल्याची घटना जीवंतपणे मांडली. या नाटिकेत सुमारे ४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात गारगोटी कचेरीवरील हल्ल्यात बलिदान केलेल्या क्रांतीविरांचे योगदान मोलाचे आहे. स्वातंत्र्यासाठी क्रांतीवीरांनी केलेल्या बलिदानामुळेच आपण मोकळा श्वास घेत आहोत. असे मत अभिनेते विलास रकटे यांनी व्यक्त केले. या क्रांतीविरांच्या कार्याबद्दल चित्रपट तयार करणार असल्याचे सांगितले.
या निमित्ताने गारगोटी कचेरी समोरील क्रांती ज्योतीस तालुक्यासह जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी अभिवादन केले. यावेळी माजी आमदार बजरंग देसाई, तहसीलदार अमरदीप वाकडे, नायब तहसीलदार शीतल देसाई, बिद्रीचे संचालक मधुकर देसाई पत्रकार किशोर आबिटकर, श्री.मौनी विद्यापीठाचे संचालक प्राचार्य आर.डी.बेलेकर, माजी जिल्हा परिषद राहुल देसाई, प्राचार्य अर्जुन आबिटकर, माजी सरपंच सर्जेराव देसाई, समाजसेवक नामदेव पाटील, सुधीर गुरव, अलकेश कांदळकर ,सभापती सरिता वरंडेकर, उपसभापती अजित देसाई, पंचायत सदस्य संग्राम देसाई, आक्काताई नलवडे, सुनील निंबाळकर, सरपंच सरिता चिले, उपसरपंच अरुण शिंदे आदी उपस्थित होते. स्वागत समाजसेवक नामदेव पाटील यांनी आभार प्राचार्य मिलिंद पांगिरेकर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published.