उल्हासनगर महानगरपालीकेसमोर अनोखे ” भिक मांगो आंदोलन “

उल्हासनगर महानगरपालीकेसमोर अनोखे ” भिक मांगो आंदोलन “

उल्हासनगर , ( गौतम वाघ) : आज दि. १९/१२/२०१७ रोजी दुपारी १२.०० वाजता उल्हास जनपथ चे संपादक व अखिल पत्रकार बहुद्देशीय संस्थेच्यावतीने महानगरपालीकेसमोर अनोखे ” भिक मांगो आंदोलन “ करण्यात आले .
ह्या आंदोलना विषयी माहिती देताना श्री शिवकुमार मिश्रा यांनी सांगितले की उल्हासनगर शहराच्या विकासात व अनधिकृत बांधकामांवर आळा घालण्यात मनपाचे अधिकारी व आयुक्त सपशेल अयशस्वी ठरले आहेत .
उल्हासनगर शहरात अनेक भुमाफियां हे शहरातील राखीव भुखंड हडप करुन अनधिकृत बांधकाम करत आहेत पण मनपाचे अधिकारी व आयुक्त हे आर्थिक हित जोपासत डोळेझाक करत आहेत .
गेले वर्षभर शिवकुमार मिश्रा यांनी ए वन बेकरी चे मालक अशोक ठाकुर यांनी अनिल अशोक टॉकीज , गुडलक बेकरीच्या बाजुला , कल्याण अंबरनाथ रोड , उल्हासनगर -३ येथे शासकीय भुखंड हडप करून दोन झाडांची कत्तल करून तसेच रहदारीसाठी असलेली गल्ली बंद करत वापरात असलेली नाली बुजवून दोन माळ्यांचे तीन तीन गाळ्यांचे अनधिकृत बांधकाम केलं आहे ज्याची तक्रार अनेक पत्रकार व जागरूक नागरिकांनी वेळोवेळी प्रभाग अधिकारी व आयुक्त यांना दिली आहे . तसेच शिवकुमार मिश्रा यांनी सदर अनधिकृत बांधकामाचे सर्व पुरावे सादर केले आहेत तरी आयुक्त ह्या अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई करण्यात असमर्थ ठरले आहेत . तसेच उल्हासनगर शिवसेना शहर प्रमुख श्री राजेंद्र चौधरी यांनी राज्य मंत्री श्री रनजीत पाटील व मुख्य सचिव यांना लेखी निवेदन देऊन सदर अनधिकृत बांधकामावर कारवाई न करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याची तक्रार केली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.