उल्हासनगरातील राष्ट्रवादीच्या नगरसेविकेचे जात प्रमाणपत्र रद्द नगरसेवक पदावर येणार गदा

उल्हासनगरातील राष्ट्रवादीच्या नगरसेविकेचे जात प्रमाणपत्र रद्द नगरसेवक पदावर येणार गदा

.

उल्हासनगर(गौतम वाघ):- उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षा कडुन प्रभाग १७ मधुन निवडुन आलेल्या पुजा कौर यांचे जातपडताळणी समितीने जात प्रमाणपत्र रद्द केले आहे . त्यानी  ओ बी सी असल्याचे जात प्रमाणपत्र निवडणुकी दरम्यान सादर केले होते. त्यांच्या जात प्रमाण पत्रावर पराभुत झालेल्या जया साधवानी यानी आक्षेप घेवुन  पुजा कौर यांची तक्रार कोकण भवन जात पडताळणी समिती कडे केली होती . तर पुजा कौर यांचे जात प्रमाण पत्र रद्द झाल्याने त्यांच्या नगरसेवक पदावर टांगती तलवार असल्याने राष्ट्रवादी पक्षाला हा मोठा झटका आहे .

उल्हासनगर महापालिकेची निवडणुक फेब्रुवारी २०१७ मध्ये झाली असुन या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तिकीटावर प्रभाग क्र . १७ मधुन निवडणुक लढवुन त्या विजयी झाल्या होत्या . तर त्या ओ बी सी प्रवर्गातुन निवडुन आल्याने पराभुत झालेल्या जया साधवानी यानी पुजा कौर यांच्या जात  प्रमाणपत्रावर आक्षेप घेवुन कोकण भवन येथिल जात पडताळ्णी समिती कडे वकील रामचंद्र मेंढाळकर यांच्या मार्फत तक्रार केली होती . पुजा कौर यांची जात लभाना असुन त्यांनी जात प्रमाण पत्र हे लमाण असल्याचे मिळवले होते . तेव्हा यावर वकील मेंढाळकर यांनी जात पडताळणी समिती च्या सदस्याना लभाना ही जात नसल्याचे सिध्द करुन दिले आहे . त्यामुळे पुजा कौर यांचे जात प्रमाण पत्र हे बोगस असल्याचे समितीच्या निदर्शनास आणुन दिले . तेव्हा समितीने कौर याचे जात प्रमाण पत्र रद्द केल्याचे पत्र तक्रारदार जया साधवानी यांना दिले आहे . त्यामुळे पुजा कौर यांच्या नगरसेवक पदावर गदा येण्याची शक्यता आहे . तर राष्ट्रवादी पक्षाला हा मोठा झटका बसला आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.