भुदरगड साठी घरगुती गॅस वितरक नेमण्याची प्रक्रिया संश्यापद

भुदरगड साठी घरगुती गॅस वितरक नेमण्याची प्रक्रिया संश्यापद

कडगाव/वार्ताहर
कडगाव ता.भुदरगड साठी घरगुती गॅस वितरक नेमणे करिता भारत पेट्रोलियम कार्पोरेशनयांचे वतीने सातारा येथील नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय इथे झालेला ड्रॉ चुकीच्या पद्धतीने झाला आहे. असा आरोप या वितरक म्हणून अर्ज केलेल्या अर्जदारांनी केला आहे.
शुक्रवार दिनांक 22/12/17 रोजी सातारा येथे झालेला संगणकीकृत ड्रॉ हा हेतुपूर्वक विशिष्ट व्यक्तीसच मिळावा या हेतूने काढण्यात आला असून त्या ठिकाणी उपस्थित इतर अर्जदारांनी ही पद्धत मान्य नसून चिट्ठी उडवून रीतसर ड्रॉ करावा अशी विनंती करूनही तेथील उपस्थित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले.
त्याच दिवशी पेट्रोलियम कॉर्पोरेशन चे अधिकारी जॉन राजूजिल्हाधिकारी यांच्या वतीने आव्हाड तसेच पुरवठा अधिकारी सातारा यांना निवेदनाद्वारे आपली फसवणूक झाली असून सदर ड्रॉ रद्द करावा आशा आशयाचे निवेदन देण्यात आले.
आज कडगाव येथील ग्रामपंचयात सभागृहात सर्व अर्जदारांची सभा होऊन या झालेल्या फसवणुकी बाबत न्यायालयीन लढाई करण्याचे ठरले.
या वेळी ऋषिकेश जाधव,दिगंबर देसाई,योगीराज देसाई,सदानंद देसाई,संदेश देसाई,एस.डी.दड्डीकर,श्रीकांत कासार,दत्तात्रय हवळ दीपक देसाई,अरविंद नाईक,संदीप देसाई,प्रणव जाधव,किर्तीराज देसाई,दत्तात्रय मनगुतकर आदी अर्जदार उपस्थित होते.

प्रतिक्रिया क्रमांक 1) सातारा येथील संगणकीय ड्रॉ पद्धत पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने पार पडली असून सुरवातीस प्रक्रिया सुरू होताच सिस्टीम फेल्युअर’ असे स्क्रीन वर दाखवण्यात आले. पुन्हा तेथील उपस्थित अधिकाऱ्यांनी मोबाईलवर संशयास्पद हालचाली केल्या व लागलीच ड्रॉ विजेत्यांचे नाव जाहीर करण्यात आले.यातील कोणतीही प्रक्रिया आम्हाला समजाऊनही सांगण्यात आलेली नव्हती. तरी ही प्रक्रिया रद्दबातल करावी.

ऋषिकेश तात्यासाहेब जाधव
माजी सरपंच तिरवडे.

प्रतिक्रिया क्रमांक 2)

सातारा येथील ड्रॉ चुकीच्या पद्धतीने करण्यात आला आहे आम्हाला सांगितलेल्या पद्धतीने ड्रॉ झालाच नाही . सर्व अर्जदारांची नावे स्क्रीनवर दिसतील व संगणकीय पद्धतीने विजेत्यांचे नाव दिसेल असे सांगितले होते.परंतु असे न घडता एका क्षणातच विजेत्याचे नाव जाहीर करण्यात आले. या वेळी हा प्रकार न समजल्याने आम्ही तेथील उपस्थित अधिकाऱ्यांना निवेदन दिले . व आता आम्ही कायदेशीर मार्गाने आमच्यावर झालेल्या अन्याया बाबत न्यायालयात दाद मागणार आहोत.

दिगंबर बचाराम देसाई.
कडगाव ता.भुदरगड

Leave a Reply

Your email address will not be published.