विविध फॕन्सी ड्रेस स्पर्धेत पौर्णिमा देवेकरचे सुयश

विविध फॕन्सी ड्रेस स्पर्धेत पौर्णिमा देवेकरचे सुयश 

गारगोटी .. /.. प्रतिनिधी
गारगोटी येथे झालेल्या युवा महोत्सव, कस्तुरी क्लब आदी संस्थानी आयोजित केलेल्या विविध फॕन्सी ड्रेस स्पर्धेत लहान गटात कु. पौर्णिमा शरद देवेकर, ( वय वर्षे ४ ), ज्ञानदीप आंगनवाडी बसरेवाडी हिचा प्रथम क्रमांक आल्या बद्दल विद्या मंदिर बसरेवाडी, ता. भुदरगड या शाळेच्या वतीने अभिनंदन सोहळा आयोजित करण्यात आला .
पौर्णिमाने बंगाली महिलेची वेशभूषा, नऊवारी साडी आदी वेशभूषा साकारल्या होत्या. पौर्णिमास आ. प्रकाशराव आबिटकर यांच्या हस्ते पारितोषिक मिळाले होते. याबद्दल तिचे अभिनंदन होत आहे. विद्या मंदिर बसरेवाडी, ता. भुदरगड या शाळेतील शिक्षक वैद्य सर, देसाई सर, यांनी अभिनंदन केले.
पौर्णिमेला तिची आई सौ. विदुला देवेकर, तिच्या शिक्षिका सौ. कांचन देवेकर, सौ. कांचन देसाई, सौ. राणी मेंगाणे यांचे मार्गदर्शन मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published.