ठाणे सॅटिस पुलावर फेरीवाल्यांचा ठिय्या – मनसैनिकांचा स्टेशन मास्तरांना घेराव घालण्याचा  प्रयत्न 

ठाणे सॅटिस पुलावर फेरीवाल्यांचा ठिय्या – मनसैनिकांचा स्टेशन मास्तरांना घेराव घालण्याचा  प्रयत्न 

 

ठाणे , ( शरद घुडे ) :
ठाणे स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांवर खळ्खट्याक करीत मनसैनिकांनी हुसकावून लावलेल्या फेरीवाल्यांची पुन्हा एकदा दबक्या पाउलांनी सॅटिस पूलावर बस्तान बसविण्याचा प्रयत्न केला. तो मनसैनिकांनी उधळून लावला. मनसैनिकांनी ठाणे स्टेशन मास्तरांना घेराव घालण्याचा प्रयत्नही यावेळी केला. 

 मागील दोन महिने ठाणे स्टेशन परिसर आणि सॅटिस  पुलाने मोकळा श्वास घेतला होता. दरम्यान गुरुवारी ठाणे स्टेशन परिसरातील सॅटीसवर फेरीवाल्यानी आपलं ठिय्या  सुरुवात केला आहे. याप्रकारची माहिती ठाणे मनसैनिकांना मिळाली. मनसैनिकांनी थेट ठाणे स्टेशन मास्तराच्या केबिनमध्ये जाऊन घेराव घालीत विचारणा केली. त्यानंतर मनसेने आपला ताफा हा सॅटीस  पुलावर वळविला. मनसैनिकांनी हालचाल करताच स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

Leave a Reply

Your email address will not be published.