ठाण्यातील पथविक्रेत्यांना पालिका देणार व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र 

ठाण्यातील पथविक्रेत्यांना पालिका देणार व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र 

 

ठाणे , ( शरद घुडे ) :
केंद्र शासनाच्या पथ विक्रेता यांना आता महापालिका व्यवसाय नोंदणीचे प्रमाणपत्र वाटप करणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

उपजीविकेचे संरक्षण व पथ विक्री विनियम अधिनियम २०१४ अंतर्गत ठाणे पालिकेने नौपाडा प्रभाग समिती क्षेत्रातील नोंदणीकृत पथविक्रेत्यांना व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. शुक्रवारी २५ फेरीवाल्यांचे उपायुक्त संदीप माळवी यांच्या हस्ते व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले. यापुढे ठाणे परिक्षेत्रात अधिकृत फेरीवाल्यांना व्यवसाय कर्णयची परवानगी देण्यात येणार आहे शासनाच्या योजनेनुसार आवश्यक पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या फेरीवाल्यांची नोंदणी करीत त्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published.