दुकानासमोर कचरा करणाऱ्या दुकानदारांचे धाबे दणाणले 

दुकानासमोर कचरा करणाऱ्या दुकानदारांचे धाबे दणाणले 

 

ठाणे , ( शरद घुडे ) :
स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी नौपाडा-कोपरी प्रभाग समितीच्या अधिकाऱ्यांनी स्टेशन परिसरातील दुकानदारांना सज्जड दम दिला आहे. कचरा दुकानदाराने डब्ब्यात टाकावा अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल अशी भूमिका स्पष्ट केल्याने दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत.

नौपाडा-कोपरी प्रभाग समितीत  अस्वच्छता पसरवणाऱ्या आणि बेकायदेशीर फेरीवाल्यांविरोधात मोहीमच हाती घेतली आहे.उपायुक्त  मारुती गायकवाड यांनी शुक्रवारी स्टेशन परिसराचा दौरा केला. कचऱ्यासाठी अनेक दुकानदारांनी डब्बेच ठेवले नसल्याचे आढळले. दुकानदारांना डब्बे आणून त्यात कचरा टाकण्याचे आदेश देण्यात आले. जर कुठल्या दुकानदाराने दुकानाबाहेर अस्तव्यस्त कचरा टाकला तर दुकानदारावर ५ हजाराचा दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश अधिकारी वर्गाला देण्यात आले आहेत, पालिका प्रशासनाच्या या सक्तीने आता दुकानदारांमध्ये धडकी भरली आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published.