महावितरण कंपनीमध्ये खाजगीकरणाला सुरुवात वीज कर्मचारी संघटनेची निदर्शने -२२ फेब्रुवारीपासून बेमुदत संपाचा इशारा 

महावितरण कंपनीमध्ये खाजगीकरणाला सुरुवात
वीज कर्मचारी संघटनेची निदर्शने -२२ फेब्रुवारीपासून बेमुदत संपाचा इशारा 

 

ठाणे , ( शरद घुडे ) :
राज्य सरकारने महावितरण कंपनीमध्ये खाजगीकरणाला सुरुवात केली आहे. याचाच निषेध करण्यासाठी आज ठाण्यात वीज कर्मचारी संघटना आणि अभियंते संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने ठाण्यातील विभागीय कार्यालयासमोर निदर्शन करण्यात आली. राज्य सरकारच्या वतीने मुंब्रा, शिळफाटा,कळवा, मालेगाव, औरंगाबाद आणि जळगाव विभागातील क्षेत्रात खाजगी कंपन्यांना फ्रेंचाइसी देण्यात आली आहे. नवीन खाजगी कंपनी आली तर ग्राहकांचे नुकसान होणार असल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. सरकारने या बाबतीत विचार केला नाही. तर २२ फेब्रुवारी पासून बेमुदत संपाचा इशारा देखील देण्यात आला.

महावितरण कंपनी व्यवस्थापनाने आपल्या अधिकार क्षेत्रात असलेल्या ७ विभागातील वीज कंपन्यांचा अधिभार खाजगी व्यवस्थपणाला द्यायचे ठरविले आहे. सरकारच्या वतीने ३ फेब्रुवारी रोजी २०१८ ला एक जाहिरात देऊन निविदा आमंत्रित केल्या आहेत. ३ जानेवारी २०१८ रोजची प्रधान ऊर्जा सचिव अरविंद सिंग यांच्या उपस्थितीमध्ये विस्तृत वाटाघाटी करण्यात आल्या आहेत. या खाजगीकरणाला विविध संघटनांनी विरोध केला आहे. सध्याच्या परिस्थिती मध्ये महावितरण विभागाकडे कर्मचाऱ्यांची संख्या कमी असून देखील त्यांनी विक्रमी वसुली केली आहे. परंतु सरकार या कडे लक्ष देत नसल्यमुळे आज ठाण्यातील विभागीय कार्यालय समोर द्वारसभा घेऊन निदर्शन करण्यात आली. या वेळी सरकारला संघटनेने निर्वाणीचा इशारा देऊन संपाचं हत्यार उपासणार असल्याचे सांगितलं आहे. या वेळेस खाजगीकरणाच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published.