रस्त्यातील बंद आणि बेवारस वाहने हटविण्याचे महापौरांचे आदेश 

रस्त्यातील बंद आणि बेवारस वाहने हटविण्याचे महापौरांचे आदेश 

 

ठाणे , ( श्याम जांबोलीकर ) :
महापालिका परिक्षेत्रात विविध रस्त्यावर बेवारस आणि बंद पडलेली वाहने हटवून रस्ते वाहतुकीसाठी खुले  करण्यात यावे असे आदेश महापौर मीनाक्षी शिंदे यांनी पालिका प्रशासनाला दिले.

महापालिका परिसरातील नागरिकांनी  वाहने बंद पडलेल्या गाड्या आणि बेवारस गाड्यां नी रस्ता व्यापला आहे. तर बेवारस वाहनेही मोठ्या प्रमाणात रस्त्यावर असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. तसेच फुटपाथ किंवा रस्त्याचे काम करताना या वाहनाचा अडथळा निर्माण होतो. म्हणून महापौर मीनाक्षी शिंदे यांनी महापालिका प्रशासन, वाहतूक विभाग आणि पोलीस विभागाला संयुक्तपनाने कारवाई करण्यासाठी पत्र दिले आहे. वाहन मालकाला नोटीस देऊन जे लोक सहकार्य करीत नसतील अशी वाहने महापालिकेच्या माध्यमातून उचलण्यात येणार असून त्याचा खर्च वाहन मालकाकडून वसूल करण्यात यावा असा उल्लेखही पत्रात करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.