डीजीसीटी ऍप ला अपयश-पालिकेचे ठाणेकरांना सवलतीचे अमिष 

डीजीसीटी ऍप ला अपयश-पालिकेचे ठाणेकरांना सवलतीचे अमिष 

 

ठाणे , ( श्याम जांबोलीकर ) :
जानेवारीच्या उत्तरार्ध पालिकेच्या डीजीसीटी ऍपचा शुभारंभ करण्यात आला होता. मात्र पालिकेची जनजागृती अपुरी पडल्याने २० लाख ठाणेकरांपैकी केवळ ६२०० ठाणेकरांनीच पालिकेचा ऍप डाऊनलोड केला. यानंतर पालिका प्रशासनाने डीजीसीटी ऍप डाऊनलोड करून मालमत्ता कराचा भरणा केल्यास सामान्य करात २ टक्के सवलत तसेच आजीमाजी सैनिकांनाही सवलतीचा नवा फंडा करीत सादर प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी येणार आहे.

पालिकेने ठाणेकरांना डीजीसीटी ऍपचा वापर करून मालमत्ताकर भरणा करावा यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी सवलतीचे अमिश दाखविणारा प्रस्ताव तयार केला आहे. २० लाख ठाणेकरांपैकी केवळ ६२०० ठाणेकरांनीच ऍप डाऊनलोड केला. आतापर्यंत किमान ५० हजार नागरिकांनी ऍप डाउनलोड करणे अपेक्षित होते. यासाठीच सोसायटीत रेनवॉटर हार्वेस्टिंग कार्यप्रणाली असेल त्यांना ५ टक्के करात सवलत, घनकचरा व्यवस्थापन योग्य रीतीने केल्यास ३ ते ५ टक्के, सोसायटी घनकचरा व्यवस्थापन आणि कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्याना ७.५ टक्के, पर्यावरण,वृक्षारोपण,गृहनिर्माणसंस्था, सदनिका धारकांना २ टक्के,  आणि आजी-माजी सैनिकांना मालमत्तेच्या सामान्य करात १०० टक्के सवलत, तसेच संरक्षण दलात शौर्य पदक व माजी सैनिकांच्या विधवा याना देखील मालमत्ताच्या एका मालमत्तेत १०० टक्के सवलत देण्यात येणार आहे. एखाद्या सोसायटीत पालिकेच्या सर्वच धोरणाची अंमलबजावणी केली असता त्यांना मालमत्तेच्या करात ३२.५ टक्के सवलत देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. महासभेत याला मंजुरीं मिळवण्यासाठी प्रस्ताव येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.