ठाणे परिवहनचे  मूळ अर्थसंकल्प परिवहन  समितीला सादर करणार 

ठाणे परिवहनचे  मूळ अर्थसंकल्प परिवहन  समितीला सादर करणार 

 

 

ठाणे , ( श्याम जांबोलीकर ) :
ठाणे पालिकेचे महत्वाचे अंग असलेली परिवहन सेवा  आपले   परिवहनचे अंदाजपत्रक परिवहन समितीला  गुरुवारी सादर करणार आहे .डबघाईला आलेल्या परिवहनला जीवदान देण्यासाठी आणि गतिमान करण्यासाठी पालिकेच्या अनुदानाचे ऑक्सिजनची आवश्यकता आहे. मागील वर्षी   २६८ कोटी २२ लाखांचा  अर्थसंकल्प  परिवहन समितीला सादर करण्यात आले होते . परिवहनच्या भरारीला अंदाजपत्रकात उत्पन्नापेक्षा दुप्पट अनुदानाची अपेक्षा धरली होती. यावर्षी ठामपा आयुक्त संजीव जयस्वाल अर्थसंकल्पामध्ये  परिवहन सक्षम करण्यासाठी काय निर्णय घेणार आहेत  याकडे  ठाणे कराचे लक्ष लागले आहे .

मागील वर्षी   डबघाईला आलेल्या परिवहन सेवेला गतिमान करण्यासाठी बसेसच्या संख्येत वाढ केल्यानंतरही परिवहन अपेक्षित भरारी घेऊ शकली नाही.  ठाणे ते  भिवंडी  ,आणि  ठाणे ते नालासोपारा  या  नव्या बसेसच्या  मार्गाला  चालू वर्षात मोठा प्रतिसाद मिळाला आहे  तसेच  यावर्षी परिवहनचे  उत्पन्नहि वाढले आहे . ठाणे ते वागले इस्टेट , ठाणे ते लोकमान्य नगर  या बसच्या  मार्गाला सातत्याने  प्रवाशांची वर्दळ असल्याने  ठाणे परिवहन सेवेमध्ये  दररोज सुमारे २९ लाख  ६६ हजार रुपयाचे उत्पन्न  मिळत आहे  मागील वर्षापेक्षा यावर्षीच्या  उत्पन्नात   वाढ झाली  आहे .

मागील अर्थसंकल्पात ठाणे  परिवहन द्वारे प्रवाशांना अद्यावत आणि सक्षम सेवा देण्यासाठी परिवहनने अर्थसंकल्पात ५ वर्षाचे “ठामपा व्हिजन” तयार केले होते . यामध्ये बसस्थानकाचा विकास,आयटी कंपोनंट,५० नवीन बसेस खरेदी, आगारांचा विकास करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती आणि महिलांसाठी तेजस्विनी बसेस खरेदी करण्यासाठी या अनुदानाचा वापर करण्याचे  नमूद करण्यात आले होते . मागील विविध कामे अद्याप अपूर्ण आहेत तसेच पूर्ण झालेली नाही . ठाणे महानगर पालिका आयुक्त याअर्थसंकल्पात परीवहन सेवा सक्षम करण्यासाठी  नवीन काय भरीव तरतूद करणार  यावर ठाणे परिवहन सेवेचे भवितव्य अवलंबून आहे

Leave a Reply

Your email address will not be published.