“शिक्षणाधिकारी मीना यादव हटाव, ठाणे जिल्हा बचाव” शिक्षकांचा नारा 

“शिक्षणाधिकारी मीना यादव हटाव, ठाणे जिल्हा बचाव” शिक्षकांचा नारा 


ठाणे जिप व जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षकांनी नोंदविला निषेध 

 

ठाणे , ( श्याम जांबोलीकर ) :
शासकीय धोरणाच्या जाचक अटी, शिक्षणाधिकारी यांची उद्धट वर्तणूक,जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या धूळ खात पडलेल्या समस्या आदींच्या निषेधार्थ गुरुवारी  ठाण्यात शिक्षक आणि शिक्षकेतर संघटनांच्या वतीने ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यलयावर मोर्चा काढण्यात आला होता ठाण्यातील कन्या शाळा येथून निघालेल्या मोर्चाची बाजारपेठेत  मोर्चची सांगता झाली या वेळी जिल्हा परिषद येथे देखील निवेदन देण्यात आले. शिक्षकांनी  “शिक्षणाधिकारी मीना यादव हटाव, ठाणे जिल्हा बचाव” अशा घोषणाबाजी करीत निषेध नोंदविला.

ठाणे जिल्हा शिक्षण विभाग प्राथमिक शिक्षण अधिकारी मीना यादव यांच्या कडे जिल्हा परिषदेनं अतिरिक्त भाग दिला आहे.  तसेच त्यांच्या उर्मट वागण्यामुळे शिक्षक देखील हैराण झाले आहेत.  जिल्हा परिषदेतील शैक्षाणिक शिक्षण आणि शक्षकेतर कर्मचायांच्या घोषित शाळांना अनुदान देण्यात यावे,अघोषित शाळा तसेच कॉलेजच्या तुकड्याना अनुदान द्या ,मराठी शाळांवरील अतिक्रमण थांबविण्यात यावे, तसेच आरटीई  नुसार प्रवेश दिलेल्या  २५ टक्के विद्यार्थ्यांची फी शासनाने कमी करावी इत्यादी २४ हुन अधिक मागण्यांचे पत्र या वेळेस जिल्हाधिकारी आणि जिल्हापरिषदेचे मुख्यकार्यकारी याना देण्यात आले आहे. शिक्षकांच्या मोर्चाचे नेतृत्व शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष ज मो अभ्यंकर, डॉ. बालाजी किणीकर, शिक्षक सेनेचे सिभागीय अध्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी केले. 

Leave a Reply

Your email address will not be published.