गुन्ह्याच्या तपासासाठी गेलेल्या  पोलीस नाईकचा ट्रेनमध्ये हार्टअटॅकने मृत्यू 

गुन्ह्याच्या तपासासाठी गेलेल्या  पोलीस नाईकचा ट्रेनमध्ये हार्टअटॅकने मृत्यू 

 

ठाणे , ( श्याम जांबोलीकर )
गुन्ह्याचा तपास  करण्यासाठी दिल्लीत गेलेल्या आणि नंतर बिहार राज्यातील पटना शहराकडे निघालेल्या ठाणे ग्रामीण पोलीस दलाचा पोलीस नाईक शशिकांत महाले यांचा  प्रवासात ट्रेनच्या शौचालयात हार्टअटॅकने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना  घडली. शुक्रवारी ठाणे ग्रामीण पोलसांनी मानवंदना देत महाले कुटुंबीयांनी त्यांच्या  पार्थिव देहावर अंत्यसंस्कार ठाण्याच्या कोकणीपाडा येथे करण्यात आले. दरम्यान महाले यांच्या कुटुंबीयांनी तीन दिवसानंतर मृतदेह मिळाल्याने नाराजी व्यक्त केली.

ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील कोकणीपाडा परिसरात राहणारे आणि ठाणे ग्रामीण पोलीस दलात नवघर पोलीस ठाण्यात पोलीस नाईक म्हणून कार्यरत होते. पोलीस नाईक  महाले हे ११ फेब्रुवारी रोजी रविवारी तपासकामासाठी दिल्लीत गेले होते.दिल्लीतील काम आटोपल्यानंतर पटना , बिहार राज्याकडे निघालेले पोलीस नाईक शशिकांत महाले हे ट्रेनमधील शौचालयात गेले, असता अचानक  हार्टअटॅक आल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अटॅक नंतर महाले यांचा मृतदेह ४ तास शौचालयातच पडून होता. त्यांचा मृतदेह मिळवण्यासाठी कुटुंबियांना धडपड करावी लागली. अखेर शुक्रवारी त्यांचा मृतदेह कार्गोद्वारे मुंबईत आणण्यात आला. ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील कोकणीपाडा येथे राहणारे शशिकांत महाले हे १२ वर्षांपासून पोलीस दलात कार्यरत आहेत. त्यांच्या मागे भाऊ, पत्नी कविता आणि दोनमुले तन्मय(११) आणि भार्गव(६) असा परिवार आहे. दरम्यान मृत पोलीस नाईक शशिकांत महाले यांचा मृतदेह तीन दिवस अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत होता. यामुळे कुटुंबीयांनी खंत व्यक्त केली. ठाणे ग्रामीण पोलीस उप अधीक्षक प्रशांत कदम यांनी मात्र मृतदेहाला उशीर झाल्याबाबत  म्हणाले मृत्यू परराज्यात झाल्याने कायदेशीर प्रक्रिया मुले उशीर झाला. महाले यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पाठीशी ठाणे ग्रामीण पोलीस सदैव राहतील. त्यांच्या कुटुंबियातील सदस्याला अनुकंपा तत्वावर नौकरीत सामावून घेण्याचे आश्वासना सोबतच त्यांचे फंड,ग्रॅज्युटी हे त्वरित कुटुंबियांना मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.