मारहाण करणाऱ्या ट्रस्टी महिलेला १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी

मारहाण करणाऱ्या ट्रस्टी महिलेला १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी

 

ठाणे , ( श्याम जांबोलीकर ) :
ठाणे स्टेशन परिसरातील गौतम विद्यालयामधील विद्यार्थ्यांना संस्था संचालकाच्या पत्नी शिल्पा यांच्यावर ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यांना शुक्रवारी न्यायालयात नेले असता १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. तर या मारहाणीची गंभीर दाखल घेत शिक्षण उप संचालक मुंबई विभाग यांनी लेखी पत्राद्वारे गौतम  विद्यालयावर प्रशासक नेमण्याचे निर्देश ठाणे शिक्षणाधिकारी (जिप ) याना दिले आहेत.

ठाणे स्टेशन रोडवरील गौतम विद्यालयात गेल्या तीन दिवसापासून विद्यार्थ्यांना करण्यात आलेल्या  मारहाणी बाबत घुसमट सुरु होती. त्यातच ट्रस्टीद्वारा मुलांनी बेंच स्नेहसंमेलनाच्या रंगीत तालमीसाठी हटविल्याचा राग धरीत पाचवी ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली. पालकांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्यानंतरही चालढकल सुरु होती. अखेर गुरुवारी पालकांनी थेट मोर्चाचं उघडल्याने अखेर ठाणे नगर पोलीस ठाण्यात ट्रस्टीच्या पत्नी शिल्पा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. शुक्रवारी त्यांना न्यायालयात नेले असता १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. ट्रस्टी शिल्पा यांची  करण्यात आली असल्याची माहिती ठाणे नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी धर्मधिकारी यांनी दिली.

व्यवस्थापन बरखास्त करा… प्रशासक बसवा 

उपशिक्षणाधिकारी यांचे लेखी आदेश 

गौतम प्राथमिक माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाण प्रकरणी राज्याच्या शिक्षण विभागाने प्रशासकीय अधिकाऱयांची नेमणूक करत संस्थेच्या वतीने चालविल्या जाणाऱया शाळांचे व्यवस्थापन रद्द करण्याचे आदेश जिल्हा शिक्षणअधिकाऱयांना दिले आहेत. या कारवाईचा वहाळ तात्काळ शिक्षण विभागाला कळवावा असे हि पत्रात नमूद करण्यात आले आहे  या मारहाणीच्या बाबतीत ओबीसी समाज संघटनेचे अध्यक्ष राजा राजापूरकर यांनी तक्रार केली होती. मतदाता जागरण अभियान ठाणे यांच्यावतीने शिक्षण विभागाला गौतम हिंदी इंग्रजी शाळेत मुलांना झालेल्या मारहाणीविषयी माहिती देत. याप्रकरणी चौकशी करण्याची विनंती निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली होती. याची दखल घेत राज्याच्या शिक्षण विभागाने जिल्हा शिक्षण अधिकारी ठाणे याना पत्राने प्रशासकीय अधिकारी यांची नेमूनक करण्याचे आदेश दिले.

Leave a Reply

Your email address will not be published.