मुंब्र्यात दोघांची गळफास लाऊन आत्महत्या , आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात मुंब्र्यात खळबळ !!!

मुंब्र्यात दोघांची गळफास लाऊन आत्महत्या , आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात मुंब्र्यात खळबळ !!!

 

ठाणे , ( शरद घुडे ) :
मुंब्रा परिसरात शनिवारी रात्री दोघा  तरुणांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. दोघांच्या आत्महत्येचे निश्चित कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र दोघे तरुण नशेच्या विळख्यात अडकलेले  असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. मुंब्रा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

शनिवारी रात्री मुंब्रा  कादर पेलेस परिसरातील रोझा  पेलेस, कौसा या इमारतीत राहणाऱ्या  २३ वर्षीय कासीम उर्फ फैसल इक्बाल चिपा हा आपल्या परिवारासह राहत होता. तो वाहन चालविण्याचा व्यवसाय करीत होता. त्याने दोनवर्ष सौदी अरब देशात नौकरी करून मुंब्र्यात परत आला होता. त्याला नशेचे व्यसन जडले होते. त्याने दोरखंडाच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली.  तर दुसरीकडे मुंब्रा परिसरातील  अमृतनगर,दर्गा रोड, पाकिजा कॉलोनी मध्ये राहणारा सलीम वली मोहम्मद शेख(२४) याने शनिवारी रात्री ११-३० वाजण्याच्या सुमारास नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सलीम हा मुंब्र्यात रस्त्यावर मोबाईलच्या सिमकार्डची विक्री करण्याचा धंदा करीत होता. त्याला तीन भाऊ आणि दोन बहिणी असा परिवार आहे. मृतक सलीम आणि कासीम उर्फ फैसल दोघेही नशेच्या विळख्यात अडकले असल्याची चर्चा मुंब्रा परिसरात सुरु होती. आत्महत्येच्या कारणांचा शोध पोलीस घेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.