बुधवारी ठाणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार

बुधवारी ठाणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार

 

ठाणे , ( श्याम जांबोलीकर ) :
ठाणे महानगरपालिकेला स्‍टेम प्रा​धिकरणाकडून तसेच ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेच्‍या मुख्य   जलवाहिनीच्‍या व पंपंग म​शिनरीच्‍या दुरुस्‍तीसाठी बुधवार दिनांक २१ फेब्रुवारी, २०१८ रोजी सकाळी ९.00 ते गुरुवार सकाळी ९.00 पर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार असून या कालावधीत घोडबंदर रोड, पवार नगर, आझादनगर,  डोंगरीपाडा, मुंब्रा काही भाग व समतानगर, रुपादेवी पाडा, ऋतुपार्क, सिध्देश्‍्वर, , साकेत, उथळसर, रेतीबंदर, वागळे इस्‍टेट, लोकमान्यनगर, श्रीनगर, मुंब्रा कोळीवाडा,  शैलेशनगर, संजयनगर व कळवा काही भाग या परिसराचा पाणी पुरवठा २४ तास बंद राहणार आहे.

या शटडाऊनमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असून, नागरिकांनी पालिकेस सहकार्य करावे असे आवाहन ठामपा पाणी पुरवठा विभागाने  प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.