ठाण्यात शिवजयंती उत्साहात साजरी

ठाण्यात शिवजयंती उत्साहात साजरी

 

ठाणे , ( शरद घुडे ) :
महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तारखेनुसार शासकीय जयंती सोमवारी (ता.१९ फेब्रु.) उत्साहात साजरी करण्यात आली.सरकारी पातळीवरील सर्वच प्राधिकरणानी आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादीसह अनेक शिवप्रेमींनी शिवजयंती साजरी करण्यात पुढाकार घेतल्याचे चित्र ठाण्यात दिसून आले.

  हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकारणा-या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मदिनावरुन वाद आहे.त्यामुळे शिवप्रेमी तिथीनुसार शिवजयंती साजरी करतात.तर शासनाच्या नोंदीनुसार शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी रोजी झाला असल्यामुळे शासकीय पातळीवर १९ फेब्रुवारीला शिवजयंती साजरी केली जाते.शासकीय पातळीवर शिवजयंती साजरी होत असल्यामुळे आणि यात शिवसेनेच्या मंडळींचा सहभाग दिसून आला नाही. दरवर्षी प्रमाणे यंदाही मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळयाला तसेच,कळवा येथील शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याला ठाणे महापालिकेच्यावतीने पुष्पहार अर्पण करुन शिवजयंती साजरी करण्यात आली.ठाणे रेल्वे स्थानकात कोकण रेल्वे प्रवाशी संघातर्फे शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार वाहण्यात आल्या.मराठा मंडळ आणि छावा संघटनेच्यावतीने शिवजयंतीनिमित्त दुचाकी रेली काढण्यात आली होती.तर,दिवसभर ठाण्यात भगवे झेंडे लावून दुचाकीधारक आणि रिक्षाचालक छत्रपती शिवरायांचा गजर करताना दिसत होते.

Leave a Reply

Your email address will not be published.