अभिनेत्रीला भामट्याने लावला लाखोंचा चुना

अभिनेत्रीला भामट्याने लावला लाखोंचा चुना

 

ठाणे , ( शरद घुडे ) :
ठाण्यात राहणाऱ्या टेलीव्हिजन अभिनेत्री शिखासिंह शहा हिला मुंबईच्या भामट्याने लाखोंचा चुना लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.दीपक चतुर्वेदी रा. बोरीवली असे भामट्याचे नाव आहे.आफ्रिकेतील घाना देशातील कार्यक्रमासाठी निमंत्रित करून कामाची पूर्ण रक्कम न देता ऑफिसला टाळे ठोकून पसार झाला.तेव्हा,फसवणूक झाल्याचे समजल्याने तिने चितळसर पोलीस ठाण्यात चतुर्वेदीवर गुन्हा दाखल केला.अधिक तपास उपनिरीक्षक डी.बी.मुकणे करीत आहेत.

ठाण्यातील पोखरण रोड नं.2 येथे राहणारी शिखासिंग ही छोट्या पडद्यावर काम करणारी अभिनेत्री आहे.बोरीवली राहणाऱ्या चतुर्वेदी याने मे 2017 रोजी तिच्या घरी येऊन पश्चिम आफ्रिकेतील घाना या देशात  होणाऱ्या गाण्यांच्या कार्यक्रमासाठी शिखा यांची निवड झाल्याचे सांगितले.तसेच,याचा मोबदला म्हणून 12 लाख देण्याचे ठरून त्यापैकी 70 हजार आगावू दिले.त्यानुसार,शिखा यांनी,घानामध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात सहभाग घेतला.मात्र,उर्वरित 11 लाख 30 हजारांची रक्कम तिला मिळाली नाही.आयोजकांनी उर्वरित रक्कम चतुर्वेदी याच्याकडे आधीच सुपूर्द केली असतानाही,चतुर्वेदी याने परस्पर रक्कम लांबवल्याचे समजल्याने त्याच्याविरोधात चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.