लासलगाव येथील रेल्वे गेट वाहतूक ठप्प

लासलगाव येथील रेल्वे गेट वाहतूक ठप्प

 

 

लासलगाव(वार्ताहर) समीर पठाण :                लासलगाव स्टेशन जवळील  चांदवड-मनमाड कडे जाणाऱ्या रस्त्यावरील रेल्वे गेट  सुमारे दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या वाहतूक कोंडीत सापडलेल्या प्रवाशांचे मात्र आतोनात हाल झाले. या नंतर मात्र सोनीसांगवी येथील शेतकरी शैलेश गंगाधर  ठाकरे यांनी थेट रेल्वे मंत्री ना.पियुष गोयल यांच्या  कडे सोशल साईटचा वापर करून तक्रार केली व तातडीने लक्ष घालावी अशी मागणी केली.

लासलगावहून चांदवड व मनमाडकडे जाणाऱ्या रस्त्यावर हे रेल्वे गेट आहे. आज सकाळी दहा  वाजता  बराच वेळ वाहतुक बंद या कोंडीत अडकलेल्या दुचाकी टाकळीच्या बारा बंगले परिसरातून शिवनदीच्या पुलाखालील छोटया जागेतून मार्गक्रमण झाल्या मात्र चार चाकींना कोटमगाव मार्गे अथवा वाकी मार्गे फेरा मारत वाट शोधावी लागली. तर कोंडीचा त्रास प्रवांशांसह इंधन टँकर व माल वाहतूक करणाऱ्या मोठ्या वाहनांना सहन करावा लागला.

प्रवासात ह्या रेल्वे गेटचा अडसर टाळावा म्हणून टाकळी मार्गे माल धक्क्यापासून उड्डाण पुलाचे काम संथ गतीने सुरु आहे.ह्या कामातील जमीन अधिग्रहणाचा प्रश्न जमिनीच्या भावावरून बऱ्याच कालावधीपासून भिजत पडला आहे. तरी या प्रश्नी शासन दरबारी लवकर निर्णय होणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रवाशांना रेल्वे गेटमुळे होणारा खोळंबा टळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.