प्रलंबित देणी देण्यासाठी  ३५ कोटी अतिरिक्त निधी मागणीची सूचना  : परिवहन समितीच्या बैठकीत सदस्यांनी मांडल्या सूचना 

प्रलंबित देणी देण्यासाठी  ३५ कोटी अतिरिक्त निधी मागणीची सूचना  :
परिवहन समितीच्या बैठकीत सदस्यांनी मांडल्या सूचना 

 

ठाणे , ( श्याम जांबोलीकर ) :
ठाणे महानगर पालिकेच्या तसेच नव्याने भरारी घेणाऱ्या परिवहन ची सेवा ठाणेकरांना उत्तम  मिळावी यासाठी नेहमीच ठाणे महानगर पालिका प्रयत्नशील राहणार आहे.  राखीव भूखंड, कामगारांची थकबाकी, तसेच नव्या बसेस या मुद्द्यांवर सोमवारी ठाणे परिवहनच्या सर्वसाधारण सभेत  चर्चा झाली. यावेळी समितीतील सदस्यांनी सेवा आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याबाबत विविध सूचना मांडल्या. या सूचना ठाणे पालिकेच्या येत्या अर्थसंकल्पीय सभेत  ठाणे परिवहन समिती सभापती अनिल भोर मांडणार असून भविष्यात या माध्यमातून परिवहन सेवेला नवसंजीवनी मिळणार आहे .

सोमवारच्या परिवहन सभेच्या बैठकीत सदस्यांनी उत्पन्न वाढीसाठी अनेक सूचना केल्या. दरम्यान प्रशासनाने सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे सर्व परिवहन सदस्यांनी स्वागत केले तसेच पर्यावरण पूरक  येत्या काळात टीएमटी ला ही स्मार्ट दिवस आल्या  शिवाय राहणार नसल्याचा आत्मविश्वास सदस्यांनी व्यक्त केला. टीएमटीकडे सध्या १७ आरक्षित भूखंड पडून आहेत. त्यातील दिवा येथील भूखंडावर टर्मिनल उभारण्यात यावे,  त्यामुळे झपाट्याने विकसित होणाऱ्या दिव्यातून पनवेल, मुंब्रा, डोंबिवली अशी सेवा देऊन प्रशासनाचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल,  तर कामगारांची थकबाकी देण्यासाठी प्रशासनाकडे अतिरिक्त ३५ कोटींची मागणी प्रशासनाने मान्य केल्यास टीएमटी कर्मचाऱ्यांसह सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचीही थकीत देणी देण्यास मदत होईल असे मत सोमवारी झालेल्या  परिवहनच्या अर्थसंकल्पा नंतरच्या पहिल्याच बैठकीत परिवहन सदस्यांनी मांडले . 

Leave a Reply

Your email address will not be published.