अंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या निवेदना नंतर कल्याण शहरात ट्रैफिक सिग्नल व सीसीटीवी लावण्यात येईल असे लेखी पत्र मनपा आयुक्तांनि दिले

अंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या निवेदना नंतर कल्याण शहरात ट्रैफिक सिग्नल व सीसीटीवी लावण्यात येईल असे लेखी पत्र मनपा आयुक्तांनि दिले

 

कल्याण , ( शरद घुडे ) अंतरराष्ट्रीय मानवाधिकार संगठन भारत , कोकण विभागाच्या वतीने श्री जाधव साहेब सहायक पोलिस आयुक्त ठाणे विभाग ,श्री आव्हाड साहेब वाहतूक विभाग ,श्री संजय ढोले बी प्रभाग अधिकारी कल्याण डोंबीवली महानगर पालिका ह्यांना आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना कोकण विभागाच्या वतीने कोकण महिला अध्यक्षा सौ केतकी बाग़ यांच्या मार्गदर्शनात निवेदन देण्यात आले की कल्याण शहरातील काही भागात वाहतूक जास्त आहे अपघाताचे प्रमाण वाढले आहे तसेच गुन्हेगारी वाढली आहे . चेन स्नेचिंग व छेडछाड प्रकारात झपाट्याने वाढ झालेली आहे तरी आपण नागरिकांच्या सोईसाठी ट्रैफिक वाहतूक सिग्नल यंत्रणा व् सी सी टीवी कॅमेरे टॉवर उभारण्यायात यावे जेणेकरून शहरात होणारे अपघात कमी होतील व् गुन्हेगारीस आळा बसेल . नागरिकांच्या व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे वतीने हे निवेदन देण्यात आले . हे निवेदन देताना मानवाधिकार पदाधिकारी श्री प्रवीण देशपांडे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष , कल्याण महिला अध्यक्षा सौ दीपाली वाकचौरे ,भूषण क्षीरसागर,श्री नरेश मटाई ,ज्ञानेश्वर सोनार कल्याण उपाध्यक्ष ,सौ रत्ना कुलथे कल्याण शहर सचिव ,सौ दिया पटेल महिला उपाध्यक्ष कल्याण ,सौ प्रमदा क्षीरसागर ,सौ मंगला घारे ,सौ राखी शिंपी ,सौ मनीषा आव्हाड ,सौ रुपाली गाडगे ,सौ स्नेहल सोपारकर आदि पदाधिकारी उपस्तिथ होते .
ह्या निवेदन पत्राची दखल घेत कल्याण मनपा आयुक्त यांनी त्वरित कल्याण शहरात सिग्नल यंत्रणा व सीसीटीव्ही कँमेरे लावण्यात येतील असे लेखी आश्वासन दिले आहे अशी माहिती आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या कोकण विभाग महिला अध्यक्ष सौ. केतकी बाग यांनी दिली .

Leave a Reply

Your email address will not be published.