गुन्हे शाखा ठाणे शहर येथे कर्तव्यावर असलेले वपोनि . श्री. राजेश बागलकोटे यांचे अल्पशा आजाराने निधन

गुन्हे शाखा ठाणे शहर येथे कर्तव्यावर असलेले वपोनि . श्री. राजेश बागलकोटे यांचे अल्पशा आजाराने निधन

 

ठाणे , प्रतिनिधी : दि. 11/03/2018 रोजी सकाळी ज्युपिटर हॉस्पिटल ठाणे येथे उपचारादरम्यान गुन्हे शाखा ठाणे शहर येथे कर्तव्यावर असलेले वपोनि श्री राजेश सुरेश बागलकोटे वय. 51 वर्षे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे .त्यांचे मुळगाव मिरज , जिल्हा सांगली हे असून ते सध्या खारेगाव , कळवा येथे रहात होते . त्यांचे पश्चात त्यांची पत्नी श्रीमती कल्याणी व मुलगा व्रुषभ हे आहेत .
श्री. बागलकोटे हे सन – 1991 बँचचे पोलीस अधिकारी असून त्यांनी ठाणे शहर , ब्रुहन्मुंबई पोलीस , स्थानिक गुन्हे शाखा , रत्नागिरी , ठाणे ग्रामीण , दहशतवाद विरोधी पथक , मुंबई आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , मुंबई व ठाणे येथे कर्तव्य केले आहे . सध्या ते मे – 2017 पासून गुन्हे शाखा ठाणे शहर येथे पोलीस निरीक्षक म्हणून कर्तव्य करत होते .
श्री राजेश बागलकोटे हे महाराष्ट्रातील एक अत्यंत हुशार , अभ्यासु व प्रामाणिक अधिकारी म्हणून प्रख्यात होते . दहशतवाद विरोधी पथक मुंबई व ठाणे येथे कार्यरत असताना सिमी संघटना व नक्षलवाद यावर त्यांनी भरीव कामगिरी केली आहे .
अश्या या ठाणे शहर पोलीस दलात कार्यरत असलेल्या कर्तव्यदक्ष अधिकार्याच्या अकाली निधनाने संपूर्ण पोलीस दलात तसेच ठाणे व सांगली जिल्ह्यात शोककळा पसरली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.