उल्हासनगर मध्ये पहिल्यांदाच ” नो हॉंकिंग डे ” साजरा !!!

उल्हासनगर मध्ये पहिल्यांदाच ” नो हॉंकिंग डे ” साजरा !!!
पोलीस, पत्रकार , शिक्षक व विद्यार्थी उत्स्फुर्तपणे सहभागी

उल्हासनगर , ( श्याम जांबोलीकर )  : ठाणे पोलीस आयुक्तालय आणि हिराली फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वाढत्या ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी एक पाऊल पुढे टाकत दि. 12/03/2018 व 13/03/2018 रोजी नो  हॉंकिंग कँपेंन चालविण्यात आले .
दि. 12/03/2018 रोजी व्हिटीसी मैदान उल्हासनगर 4 येथे उल्हासनगरमधील 13 शाळांमधून सुमारे 2961 विद्यार्थ्यांनी व 482 पोलीस , पत्रकार तसेच शिक्षकांनी सहभाग नोंदविला .
सदर कार्यक्रमाचे सुरवातीला श्री. अंकित गोयल पोलीस उपायुक्त परिमंडळ -4 यांनी अजानतेपणी होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाला रोखण्यासाठी उपस्थितांना शप्पथ देण्यात आली . य कार्यक्रमाकरीता उल्हासनगरमधील हरेक्रुष्ण , एनसीटी विद्यालय , आरजीएस स्कूल , सत्य साई , यशवंत विद्यालय , शिवशंभू स्कूल , गुरूनानक विकासमंदिर , सेंट पॉल , उल्हास विद्यालय , विजयाताई विद्यामंदिर , आनंद विद्यालय , झुलेलाल स्कूल या शाळांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविला .
ह्या अत्यंत सुंदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सरिता खानचंदानी यांनी केले. शांती उत्सव या नावाने चालणारा हा उपक्रम उल्हासनगर शहरांमध्ये पहिल्यांदाच होत असल्याने जनतेमध्ये याबाबत अतिशय उत्सुकता दिसून आली. हा कार्यक्रम दि. 13/03/2018 रोजी ” नो हॉंकिंग डे ” म्हणून झुलेलालगेट, कैलाश कॉलनी , उल्हासनगर – 5 येथे आयोजित करण्यात आला होता .
या कार्यक्रमामध्ये उल्हासनगर शहराच्या प्रथम नागरिक सौ. मीना आयलानी , उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त श्री. राजेंद्र निंबाळकर , तसेच पोलीस उपायुक्त श्री. अंकित गोयल परिमंडळ 4 व हिराली फाऊंडेशनचे संयोजक श्री. पुरषोत्तम खानचंदानी इत्यादिंनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . त्यानंतर सनराईज इंटरनॅशनल स्कूल मधील विद्यार्थ्यांनी स्केटिंग करून ध्वनिप्रदूषणावर असणारे वेगवेगळे फलक हातामध्ये घेऊन त्यामधून शांतीचा संदेश दिला. या कार्यक्रमाकरीता वेगवेगळ्या शाळांमधून 1435 विद्यार्थी , 151 शांतीदूत , रिक्षा चालक तसेच 64 शिक्षक व 150 पोलीस , पत्रकार व समाजसेवक यांच्या उपस्थितीत मानवीसाखळी बनविण्यात आली .
या कार्यक्रमाकरीता अंबरनाथ मधील फातिमा स्कूल , फॉदर एग्नेल स्कूल , एस आय ई एस स्कूल , गुरूकुल ग्रैंड युनियन , नेशनल उर्दू स्कूल , मोरवली नगरपालिका स्कूल , इत्यादी शाळांमधील विद्यार्थ्यांनी तसेच बदलापूर मधून आलेल्या तसेच आरकेटी कॉलेज मधील एनसीसी केडेट यांनी सुद्धा शांती उत्सव मध्ये उत्स्फुर्तपणे भाग घेऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली . कार्यक्रम संपल्यानंतर विविध वाहनांवर तयार करण्यात आलेले वेगवेगळ्या रंगाचे नो हॉंकिंगचा संदेश देणारे स्टिकर लावण्यात आले .
या कार्यक्रमामध्ये महत्त्वाचे योगदान हे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. पाटील ( अंबरनाथ विभाग ) , सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. गोसावी ( वाहतूक शाखा उल्हासनगर ) , पोनी. शिरसाठ, पोनी. पालवे , पोनी. पलंगे , पोनी. डोळस , पोनी. वाघ , पोउनिरी. दिनेश पाटील , पोउनिरी. विलासकुमार सानप इत्यादिंचे अमुल्य सहकार्याने पार पडला .

Leave a Reply

Your email address will not be published.