कल्याण येथील समाज सुधारक फौंडेशन संस्थेतर्फे महिला दिवस साजरा

कल्याण येथील समाज सुधारक फौंडेशन संस्थेतर्फे महिला दिवस साजरा
विविध क्षेत्रातील 22 महिलांचा महिला नेतृत्व पुरस्कार देऊन केला सन्मान

 

कल्याण , ( शरद घुडे ) : कल्याण येथील समाज सुधारक फौंडेशनच्या वतीने जागतिक महिला दिवस येथील के एम अग्रवाल महाविद्यालयात साजरा करण्यात आला. याप्रसंगी मुस्लिम समाजातून आय ए एस झालेल्या पहिल्या अधिकारी उम्मे फरदिन आदिल, नवकाळ चे पत्रकार किरण सोनावणे, के एम अग्रवाल महाविद्यालयाचे ओमप्रकाश पांडे, मोहिंदरसिंग काबूलसिंग महाविद्यालयाचे परमप्रीत सैनी, मुंबई मिररच्या सहसंपादिका अलका धुपकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते
संस्थेच्या अध्यक्षा डॉ रूपींदर कौर-मुरजानी यांनी सांगितले की, त्यांची संस्था ही प्रामुख्याने बेटी बचाव-बेटी पढाव आणि आदिवासी कुटुंब यात ठाणे जिल्ह्यातील मूरबाड, कसारा, टिटवाळा परिसरात काम करते. महिलांना प्रोत्साहन आणि प्रेरणा मिळावी म्हणून महिला दिवसाचे निमित्त साधून हा कार्यक्रम आयोजित केला

डर के आगे जीत है

मुस्लिम समाजातील पहिल्या आय एस अधिकारी उम्मे आदिल म्हणाल्या की, आता परिस्थिती खूप सुधारली आहे, मात्र मी ज्या कुटुंबातून आणि आसाम सारख्या राज्यातून आली तिथे मुलीच्या शिक्षणासाठी कुटुंब फार इच्छुक नसते, मुलीकडे जबाबदारी म्हणून पाहिले जाते, मात्र मी ते वर्तुळ तोडले, त्यासाठी मला सर्वप्रथम स्वतासोबत लढावे लागले, नंतर कुटुंब आणि नंतर समाजातील भीती सोबत. त्यामुळे मुली आणि महिलांनी सर्वप्रथम स्वता प्रत्येक गोष्टीची भीती सोडावी कारण ” डर के आगे जित है “

ज्या घरात ज्योतिबा तिथे सावित्री, आणि जिथे जिजाऊ, तिथे छत्रपती

पुरुष शिकला तर तो एकटा सुशिक्षित होतो, मात्र स्त्री शिकली तर अवघे कुटुंब सुशिक्षित होते, त्यामुळे शिक्षण आणि स्वावलंबन हे स्त्रीच्या विकासाची दोन चाके आहेत. ज्या स्त्रिया सुशिक्षित आणि स्वावलंबी असतात त्या आपोआप समर्थ होत जातात, यासाठी ज्या घरात पुरुष ज्योतिबा होतो त्या ठिकाणी सावित्री तैयार होते आणि ज्या कुटुंबात जिजाऊ असते त्या ठिकाणी छत्रपती तैयार होतात, असे मत नवाकाळ चे पत्रकार किरण सोनावणे यांनी आपल्या भाषणात मांडले.
मुंबई मिरर च्या सहसंपादिका अलका धुपकर म्हणाल्या की, महिला आणि मुलींनी पारंपारिक चौकटीतून बाहेर पडले पाहिजे
यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी आपले कराटे, नृत्य आणि गाण्यातील कौशल्य सादर केले, आदिवासी विभागातून आलेल्या मुलींनी सुद्धा आपले कलागुण प्रदर्शित केले .

Leave a Reply

Your email address will not be published.