रेल्वे भुयारी वळण रस्ते कामांचीही लवकरच सुरवात —-खासदार हरीश्चंद चव्हाण

रेल्वे भुयारी वळण रस्ते कामांचीही लवकरच सुरवात —-खासदार हरीश्चंद चव्हाण

लासलगाव(वार्ताहर)समीर पठाण
लासलगाव रेल्वे फाटक भुयारी मार्गाला दोेन कोटीचा निधी मंजुर

लासलगाव येथील जिल्हा परिषद सदस्य डी. के.जगताप यांच्या प्रयत्नातून लवकरच लासलगाव  येथील  रेल्वे गेटवर वाहतुक कोंडी कमी होण्याकरिता  भुयारी मार्गाला दोन कोटी रुपयांचा निधी देऊन कामास सुरवात होईल  तसेच प्रलंबित उड्डाणपूल व वळण रस्ते कामांचीही सुरवात होईल असे प्रतिपादन खासदार हरीश्चंद चव्हाण यांनी केले.

जिल्हा परिषद सेस निधीमधून वेगवेगळ्या ठिकाणी विकास कामाचे उदघाटन खासदार हरिश्चंद्र चव्हाण  यांच्या हस्ते व  जि.प.सदस्या कलावती हरिश्चंद्र चव्हाण,भाजपचे जेष्ठ नेते सुरेशबाबा पाटील,माजी आमदार कल्याणराव पाटील,नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील,संजय पाटील,पंचायत समिती सदस्या रंजनाताई  पाटील,बाजार समिती चे संचालक सुवर्णा जगताप,निफाड तालुका भाजपाध्यक्ष संजय वाबळे,पंचायत समिती सदस्य शिवा सुरासे,प्रकाश दायमा,संतोष पलोड,कैलास सोनवणे,बापु आहेर यांच्या उपस्थितीत करण्यात आले
गणेश मंदीराच्या प्रांगणात झालेल्या छोटेखाणी कार्यक्रमाच्या जि प सदस्य डि.के.नाना यांनी प्रास्ताविक भाषणात लासलगाव बस स्टँड मागील रस्ता ते स्टेशन रोड,डाॅ उषा बंदछोडे हॉस्पिटल ते स्टेशन रोड,राधानागर,दळवी हॉस्पिटल ते शिवरस्ता,दुर्गामंदिर,गणेशमंदिर ते समर्थकृपा रस्ता , थेटाळे ते धोंडिबा वाढवणे वस्ती,कोटमगाव अंतर्गत रस्ता,थेटाळे – लासलगाव रस्तापुलाचे काम, कोटमगाव जी प शाळा दुरुस्ती या कामांचा शुभारंभ  झाला आहे असे सांगितले.यावेळी मान्यवर पाहुण्यांचा डि.के नाना,सुवर्णा जगताप व गणेश मंदीर विश्वस्तांनी शाॅल व श्रीफळ देवुन सत्कार केला.

याप्रसंगी  सुरेश बाबा पाटील यांनी अोझरखेड  कालव्याच्या २७,२८ क्रमांकाच्या वितरिकांच्या कामे तातडीने होणार असुन सुरगाणा तालुक्यातील ‘ऐकदरा’ या गावाजवळ पाच टी.एम.सी क्षमतेचे धरण लवकरच होऊन त्याचे पाणी दोन वर्षांच्या कालावधीत चांदवड,निफाड तालुक्याला मिळेल असे सांगुन मांजरपाडा प्रकल्पातील मुख्य अडचणीचा बोगदा कामाला लवकरच सुरवात होऊन जुन अखेर पर्यंत काम पुर्णत्वाला जाइल असे सांगितले.
लासलगाव येथील ग्रामपंचायत सदस्य बापु लचके , उत्तम घंगाळे,कैलास जैन ,नवनाथ श्रीवास्तव  तसेच  शंतनु पाटील सौ.वैष्णवी पाटील,अँड.वाल्मीकराव गायकवाड,दिलीप पानगव्हाणे,किशोर क्षीरसागर रामनाथ शेजवळ यांचे सह नागरीक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.