” प्रहार जनशक्ती ” पक्षाच्या ठाणे जिल्हा अध्यक्षपदी श्री. संभाजी जाधव !!!

” प्रहार जनशक्ती ” पक्षाच्या ठाणे जिल्हा अध्यक्षपदी श्री. संभाजी जाधव !!!

ठाणे , प्रतिनिधी : ठाण्यातील ज्येष्ठ समाजसेवक व प्रसिद्ध व्यवसायी श्री. संभाजी जाधव यांची मा.आमदार ओमप्रकाश कडू उर्फ बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशानुसार व एड. अजय तापकीर संपर्क अध्यक्ष कोकण विभाग यांच्या मार्गदर्शनानुसार ” ठाणे जिल्हाध्यक्ष “ पदी नियुक्ती करण्यात आली आहे .
संभाजी जाधव हे मुळचे सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील आहेत पण व्यवसाय निमित्ताने ठाण्यात स्थाईक झाले आहेत . समाजसेवा रक्तातच असल्याने ते ठाण्यात ही स्वस्थ बसले नाहीत , गोरगरीब , अडल्या नडलेल्याची मदत करणे व अर्ध्या रात्रीला लोकांच्या मदतीला धावून जाण्याची भावना असल्याने तळागाळातील गरजू लोकांच्यात संभाजी जाधव हे नाव म्हणजे ” आपली हक्काची व्यक्ती ” म्हणून प्रसिद्ध झाले आहे . त्यांच्या याच समाजसेवी व्रुत्तीमुळे व ठाणे जिल्ह्यातील राजकीय तसेच जनसामान्यांपर्यंत त्यांचाविषयी प्रेम व आदर पाहून प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व मा.आमदार श्री. बच्चूभाऊ कडू यांनी त्यांच्यावर ठाणे जिल्ह्याची जबाबदारी सोपवली आहे .
सदर प्रसंगी प्रहार विद्यार्थी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ऐड.मनोज टेकाडे , ठाणे शहर अध्यक्ष श्री. चंद्रकांत गायकवाड व इतर प्रदेश पदाधिकारी उपस्थित होते .येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक गाव व तालुका पातळीवर ” प्रहार जनशक्ती “ पक्षाचे संघठन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नवनियुक्त ठाणे जिल्हाध्यक्ष श्री. संभाजी जगन्नाथ जाधव यांनी सांगितले .
संभाजी जाधव यांच्या नियुक्तीमुळे ठाणे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये तसेच जनसामान्यांमधे आनंदाचे वातावरण पसरले असुन सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.