अंबरनाथ उल्हासनगरच्या वाढीव पाणीपुरवठ्यासाठी आमदार डॉ. बालाजी किणीकर  यांची विधान भवनाच्या पाय-यांवर निदर्शने

अंबरनाथ उल्हासनगरच्या वाढीव पाणीपुरवठ्यासाठी आमदार डॉ. बालाजी किणीकर  यांची विधान भवनाच्या पाय-यांवर निदर्शने

 

अंबरनाथ , प्रतिनिधी : अंबरनाथ व उल्हासनगर शहरांसाठी आरक्षित असलेला वाढीव पाणीपुरवठा त्वरित लागू व्हावा या मागणी करता आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंगळवारी विधानभवनाच्या पायऱ्यावर जोरदार निदर्शने केली.

यावेळी आमदार सुभाष भोईर, मंगेश कुडाळकर, राहुल कुल हे सहभागी झाले होते.

सद्यःस्थितीला  या दोन्ही शहरांना अपुरा पाणी पुरवठा होत असून उल्हासनगर शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा होत असून ऐन उन्हाळ्यामध्ये नागरिकांना अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असल्याची गंभीर दखल घेत अंबरनाथ शहराकरिता ३० एम.एल.डी. व उल्हासनगर शहराकरिता ५० एम.एल.डी. आरक्षित असलेला पाणीपुरवठा त्वरित लागू करण्यात यावा या मागणीकरिता आमदार डॉ. बालाजी किणीकर  यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर निदर्शने केली.

यंदाच्या वर्षी बारवी धरण क्षेत्रात पाऊस चांगला झाल्याने तसेच धरणाची उंची वाढविल्याने धरण क्षेत्रात पाणीसाठा चांगल्या प्रमाणात उपलब्ध आहे. परंतु, औद्योगिक महामंडळाच्या व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या नियोजनातील अभावामुळे नागरिकांना पाणी टंचाई ला सामोरे जावे लागत असल्याने या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी हि मागणी आमदार डॉ. किणीकर यांनी यावेळी केली.

अंबरनाथ व उल्हासनगर हि शहरे मुंबई महानगर क्षेत्रातील महत्वाचे औद्योगिक शहरे असून या शहरांच्या लोकसंख्येत झपाटयाने वाढत होत आहे. अंबरनाथ उल्हासनगर या दोन्ही शहरांमध्ये औद्योगिक मोठ्या प्रमाणावर असून या शहरांमध्ये वाढत्या औद्योगिकीकरणामुळे शहराचा विकास ही झपाटयाने होत असून याठिकाणी पाण्याची मागणी सातत्याने वाढत आहे. तसेच अंबरनाथ व उल्हासनगर या शहरांमधली प्रगतीपथावर असलेली गृहसंकुले विचारात घेवुन लोकसंख्येत सुमारे ३ लाख एवढी भर येत्या एक ते दोन वर्षात होईल असे गृहीत धरुन या शहरासाठी अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध होणे अत्यंत आवश्यक असून याकरिता पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाने तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्याने आमदार डॉ. बालाजी किणीकर सातत्याने पाठपुरावा करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.